कोरोना व्हायरसबाबत भारतात ‘अलर्ट’ ! अशी घ्या काळजी

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – चीन नंतर आता कोरोना व्हायरस भारतात दाखल झाला आहे त्यामुळे देशाच्या अनेक भागांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. यासंर्भात केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन सिंह यांनी मंगळवारी एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की विदेशी प्रवास करून येणाऱ्या सर्व प्रवाश्यांची तपासणी विमान तळावरच केली जात आहे जेणेकरून हा व्हायरस देशभर पसरू नये.

डॉ हर्षवर्धन म्हणाले की कोरोना बाबत आतापर्यंत केलेल्या सर्व चाचण्या नकारात्मक असल्याचे आढळून आले आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी जे चीनमधून भारतात आले होते, केंद्र सरकारने त्यांची देखील तपासणी केली आहे.

काय आहे कोरोना व्हायरस ?
अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल आणि प्रिवेंशन (सीडीएस) नुसार, कोरोना व्हायरस ऊंट,मांजर यांसारख्या प्राण्यांमधून माणसाच्या शरीरात जातो आणि त्याचे परिणाम खूप घातक होतात. यामुळे निमोनिया देखील होऊ शकतो.

कोरोना व्हायरस पासून वाचण्यासाठी ही घ्या खबरदारी
कोरोना व्हायरस पासून वाचण्यासाठी खोकताना,शिंकताना तोंडावर रुमाल नक्की धरा.
हा व्हायरस हवेतून पसरतो म्हणून तोंडाला मास्क लावून बाहेर पडा. साबणाने हात स्वच्छ धुवा.

आजारी माणसाच्या सानिध्यात थांबणे टाळा.
जंगली प्राणी आणि पाळीव प्रांत्यांपासून सुरक्षित अंतर ठेवून रहा. शाकाहारी आहार खाताना काळजी घ्या.

किती गंभीर आहे हा व्हायरस ?
कोरोना व्हायरसमुळे व्यक्तीला सर्दी,खोकला आणि ताप यासारख्या आजारांना सामोरे जावे लागते. परंतु याकडे दुर्लक्ष झाल्यास व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकतो.

फेसबुक पेज लाईक करा