अलर्ट ! स्मार्टफोनमधून त्वरित हटवा ‘हे’ 37 Android Apps

पोलीसनामा ऑनलाईन : गुगलने अलीकडेच प्ले स्टोअर वरून 164 मोबाइल ॲप्स हटविले आहेत. हे ॲप्स 1 कोटीहून अधिक वेळा डाउनलोड केले गेले आहेत. कंपनीने या अ‍ॅप्सचे CopyCatz ॲप्स म्हणून वर्णन केले आहे जे इतर अ‍ॅप्सच्या कॉपी आहेत आणि डाउनलोडनंतर वापरकर्त्यांना जाहिराती दाखवत असत. हे ॲप्स मॅलिशीअस आहेत आणि वापरकर्त्यांच्या स्मार्टफोनमधील डेटा खराब करू शकतात. यातील 37 अ‍ॅप्स सर्वाधिक डाउनलोड केले गेले आहेत. आपल्या फोनमध्येही हे 37 ॲप्स असतील तर के त्वरित अनस्टॉल करा.

Wifi Key – Free Master Wifi
Super Phone Cleaner 2020
Repair System For Android & Speed Booster
Secure Gallery Vault: Photos, Videos Privacy Safe
Ringtone maker – Mp3 cutter
Name Art Photo Editor
Smart Cleaner-Battery Saver, Super Booster
Rain Photo Maker – Rain Effect Editor
Chronometer
Loudest alarm clock ever
Ringtone Maker Ultimate New Mp3 Cutter
Video Music Cutter & Merge Studio
Wifi File Transfer 2019
Wifi Speed Test
WPS WPA Wifi Test
Lock app with Password – Applock All App Protector
Photo Editor Awesome Frame Effects 3D
Lovedays Memory 2020 – Love Counter Together
Magnifier Zoom + Flashlight
Max Cleaner – Speed Booster Pro 2021
Motocross Racing 2018
Nox Cool Master – Cool Down 2020
OS 13 Launcher – Phone 11 Pro Launcher
OS Launcher 12 for iPhone X
Battery Saver Pro 2020 – New Power Saver
Block Puzzle 102 New Tentris Mania
DJ Mixer Studio 2018
GPS Speedometer
Graffiti Photo Editor – Graffiti Creator
iSwipe Phone X
3D Photo Editor
3D Tattoo Photo Editor & Ideas
Applock 2020 – App Locker & privacy guard
AppLock New 2019 – Privacy Zone & Lock your apps
Assistive Touch 2020
Audio Video Editor
Audio Video Mixer

जानेवारीच्या उत्तरार्धात, व्हाईट ऑपरेशन सॅटोरी थ्रेट इंटेलिजेंस अँड रिसर्च टीमला या 164 ॲप्स बद्दल माहिती मिळाली होती, जे com.tdc.adservice पॅकेज अंतर्गत अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी नको असलेल्या जाहिराती पाठवत होते. गुगलने तातडीने कारवाई करत हे ॲप्स काढून टाकले होते. सायबर हल्ल्यांसह लाखो अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी हे अ‍ॅप्स धोकादायक ठरू शकतात.

लोकप्रिय ॲप्सच्या नावाचा करत होते वापर

हे अ‍प्स लोकप्रिय अ‍ॅप्सचे नाव आणि डिस्क्रिप्शन वापरत आणि वापरकर्त्यांनी हे डाउनलोड करताच त्यांना नको असलेल्या जाहिराती पाठवत. या जाहिराती वापरकर्त्यांच्या फोनसाठी आणि त्यातील डेटासाठी धोकादायक ठरू शकतात