RBI ची नवी घोषणा ! आता तुम्हाला बदलावं लागेल तुमचं ‘चेक’ बुक, ‘ही’ आहे अंतिम तारीख, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही पैशांचा व्यवहार चेकद्वारे करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) संपूर्ण देशात सप्टेंबर 2020 पर्यंत चेक ट्रंकेशन सिस्टिम (सीटीएस) लागू करण्याची घोषणा गुरुवारी केली आहे. त्यामुळे सप्टेंबर पासून बँका नॉन-सीटीएस चेक स्विकारणार नाही. आपल्याकडे जुने चेक बुक असल्यास ते बँकेत जमा करून नवीन सीटीएस चेक बुक घ्यावे लागेल. सीटीएस प्रणालीअंतर्गत संबंधित बँकेला प्रत्यक्ष धनादेश देण्याऐवजी तुम्ही घरबसल्या धनादेशचा फोटो पाठवू शकता. 2010 मध्ये आरबीआयने ही प्रणाली सुरु केली होती. त्यावेळी ठरावीक शहरांमध्येच ही प्रणाली कार्य़रत होती.

बहुतेक बँकांनी 1 जानेवारी 2020 पासून सीटीएस नसलेले धनादेश क्लिअर करणे बंद केले आहे. आपल्या चेक बुकवर सीटीएस -2010 असे नसेल तर ते चेक बुक जुने चेक बुक आहे. चेक टंकेशन सिस्टिम 1 जानेवारी 2013 पासून देशातील सर्व बँकांमध्ये लागू करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हाला नव्या नियमानुसार आपले जुने चेक बुक बँकेत जमा करून सीटीएस -2010 चे चेकबुक घ्यावे लागणार आहे.

चेक टंकेशन सिस्टिम म्हणजे काय ?
सीटीएसमधील धनादेश क्लिअर करण्यासाठी एका बँकेतून दुसऱ्या बँकेत चेक नेण्याची गरज नाही. फक्त त्याची इलेक्ट्रॉनिक प्रत दिली जाते. या सिस्टिमनुसार धनादेश एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्यास लागणारा वेळ कमी लागतो. तसेच चेक प्रोसेसिंगच्या प्रक्रियेचा वेळ वाचवून संपुर्ण प्रक्रिया सुधारते. ही पद्धत संपूर्ण जगात अवलंबली जात आहे.

जुन्या चेक बुकचे काय करायचे ?
आपल्याकडे सीटीएस नसलेले चेक बुक असल्यास, तुम्ही बँकेकडे सीटीएस चेकबुकची मागणी करु शकता. बँक तुम्हाला जुन्या चेकबुकच्या बदल्यात नवे चेकबुक देईल. या साठी बँक कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.