Alert ! Twitter ला ताबडतोब करा अपडेट, कंपनीनं दिली युजर्सला सिक्युरिटी वॉर्निंग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरने आपल्या अँड्रॉईड युजर्सना सिक्युरिटी मेसेजद्वारे अलर्ट केले आहे. ट्विटरने अनेक युजर्सना ऍप अपडेट करण्यास सांगितले आहे. वास्तविक साइटवर एक बग आढळला आहे. या बगमुळे युजर्सच्या खासगी मेसेजचा (डीएम) खुलासा होत आहे. बगमुळे अँड्रॉइड ८ आणि अँड्रॉइड ९ युजर्सचे नुकसान होत होते. कंपनीनुसार, ९६ टक्के अँड्रॉइड ट्विटर युजर्सकडे आधीपासूनच अँड्रॉइड सिक्युरिटी पॅच आहे, जो त्यांना अशा बगपासून वाचवतो. ट्विटरला बुधवारी अँड्रॉइड अ‍ॅपमध्ये एक मोठा सिक्युरिटी फ्लॉ आढळला.

४ टक्के युजर्स झाले बग प्रभावित

मात्र ट्विटरने दावा केला आहे की, या त्रुटीचा फायदा घेण्याचे कोणतेही पुरावे समोर आलेले नाहीत आणि ते वेळेत सापडले. ट्विटरने म्हटले की, सुमारे ४ टक्के ट्विटर युजर्सवर याचा परिणाम झाला आहे आणि या युजर्सनाच सिक्युरिटी मेसेज पाठवण्यात आले आहेत. या युजर्सना अ‍ॅप उघडल्यावर अलर्ट दिसून येतो, ज्यामध्ये अ‍ॅप अपडेट करण्याचा सल्ला दिला गेला आहे. युजर्सनी ट्विटर अ‍ॅपला नवीन व्हर्जनमध्ये अपडेट करावे, ज्यामध्ये हा बग काढला गेला आहे.

बग टाळण्यासाठी ट्विटर अपडेट करा

कंपनीने म्हटले, “आपला ट्विटर डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी, कृपया सर्व Android डिव्हाइसवर ट्विटरचे नवीन व्हर्जन अपडेट करा.” बगचा iOS किंवा Twitter.com साठी ट्विटरवर परिणाम झालेला नाही. या बगचे निराकरण २०१८ मध्येच प्रसिद्ध केले गेले होते, पण अद्याप बऱ्याच युजर्सनी त्यांचा अ‍ॅप अपडेट करण्याची आवश्यकता आहे.

गेल्या काही दिवसांपासून जगभरात युजर्सच्या डेटाविषयी गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. अलीकडेच ट्विटरवर आतापर्यंतची सर्वात मोठी हॅकिंग झाली. यावेळी अनेक हाय प्रोफाइल अकाउंटही हॅक झाले होते. यामध्ये अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा, बिल गेट्स, ऍलन मस्क आणि रॅपर कायन वेस्टसह १३० हाय प्रोफाइल सेलिब्रिटी, राजकारणी आणि व्यवसाय खात्यांचाही समावेश होता.