प्रियसीवर सरकारी खजिन्यातील पैसे खर्च करत आहेत रशियाचे राष्ट्रपती

पोलीसनामा ऑनलाइन टीम – रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. राष्ट्रपतींकडे १०० अब्ज रूपयांचं घर असून ते त्यांच्या प्रियसींवर सरकारी खजान्यातील पैसा खर्च करत आहेत, असा दावा पुतीन यांचे कट्टर विरोधी मानले जाणारे एलेक्सी नवलनीने पुतिन यांनी केला आहे. एवढेच नाही तर पुतीन यांच्या वैयक्तिक जीवनाबाबतही त्यांनी अनेक खुलासे केले आहेत.

नवलनी म्हणाले की, राष्ट्रपती आपल्या परिवारावर खासकरून १७ वर्षीय त्यांच्या मुलीलाही खर्चासाठी सरकारी खजान्यातून पैसे देतात. दरम्यान नवलनी यांना गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये ‘नर्व एजेंट'(विष) देण्यात आलं होतं. ज्यामुळे ते गंभीर आजारी पडले होते.

एलेक्सी नवलीन यांच्या म्हणण्यानुसार, पुतिन हे ज्या लोकांवर पैसा खर्च करत आहेत त्यात त्यांची कथित पार्टनर अलीना कबाएवा, आधीची पत्नी स्वेतलाना आणि त्यांची १७ वर्षीय मुलीचा समावेश आहे. व्लादिमीर पुतिन यांनी १०० अब्ज रूपये खर्च करून काळ्या समुद्राच्या तटावर एक आलिशान महाल बांधला आहे. या महालात स्ट्रीप क्लब कॅसिनो डान्स मॅट, स्पा आणि थिएटर आहे. याची थ्रीडी इमेज धक्कादायक आहे. घराबाहेर द्राक्षांची बाग आणि आत एक चर्च आहे. नवलनी यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये या घराबाबत सगळी माहिती दिली आहे. या घराबाहेर कडक सुरक्षा आहे. या घराला प्रायव्हेट बीच आहे आणि खाजगी सुरक्षा आहे. हा पूर्ण परिसर नो फ्लाय झोनमध्ये येतो. याला एकप्रकारे रशियाच्या आत एक वेगळं राज्य म्हटलं जाऊ शकतं.

पुतीन यांच्या घरी सफाई करणारी क्रिवोनोगिख काही दिवसांपूर्वी एक सामान्य तरूणी होती. पण आता ती आश्चर्यजनकपणे फार श्रीमंत झाली आहे. कुणालाही माहीत नाही तिच्याकडे इतके पैसे कुठून आले. हे न उलगडलेले कोडेच आहे. माझ्या मते, क्रिवोनोगिखसोबत पुतिन यांची भेट १९९० मध्ये झाली होती आणि २००३ मध्ये तिने पुतिन यांच्या मुलाला जन्म दिला होता. कदाचित हेच कारण आहे की, तिला आता लक्झरी अपार्टमेंट मिळाले आहेत. इतकेच नाही तर तिला रोसैया बॅंकेत ३ टक्के हिस्साही देण्यात आला आहे. त्याचबरोबर क्रिवोनोगिखसाठी पुतिन यांनी एक ११८ फूट Yacht सुद्धा खरेदी केला आहे. एकूणच पुतिन हे स्वत:ला राजा समजतात आणि त्यांच्याकडे अमाप संपत्ती आहे, असे त्यांच्या विरोधकांचे म्हणणे आहे.

देशात दोन कोटी गरीब आहेत. पण पुतिन हे त्यांची कथित गर्लफ्रेन्ड अलीना कबाएवावर पैसा खर्च करत असल्याचा दावाही नवलीन यांनी केला आहे. ते म्हणाले की, कबाएवा ही रशियातील मोठे वृत्तपत्र आणि टीव्ही चॅनल्सना नियंत्रित करते. कवाएवाचा अधिकृत पगार ७.८ मिलियन पाउंड आहे. जर जिमनास्ट राहिलेली कबाएवा पुतिन यांच्या संपर्कात आली नसती आली तर इतका पैसा कधीही मिळवू शकली नसती.