Ali Daruwala | भाजपचे प्रवक्ते अली दारुवाला यांची पी. ए. इनामदार विद्यापीठाच्या नियामक मंडळावर सिनेट सदस्य म्हणून नियुक्ती

Ali Daruwala | BJP Spokesperson Ali Daruwala becomes PA Inamdar University’s Governing Council Senate Member

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – Ali Daruwala | भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते अली दारुवाला यांची डॉ. पी. ए. इनामदार विद्यापीठाच्या (PA Inamdar University) नियामक मंडळावर सदस्य म्हणून शासनाच्या वतीने नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. पी. ए. इनामदार विद्यापीठाच्या अधिनियमानुसार त्यात राज्य शासनाने नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीचा नियामक मंडळात सदस्य म्हणून अंतर्भाव करण्याची तरतुद करण्यात आली आहे. या तरतुदीला अनुसरुन विद्यापीठ नियामक मंडळावर राज्य शासनाने अली दारुवाला यांची नियुक्ती केली आहे. (BJP Spokesperson Ali Daruwala News)

डॉ. पी. ए. इनामदार विद्यापीठाच्या कामकाजावर अली दारुवाला हे सरकारच्या वतीने देखरेख करतील. शासन, शैक्षणिक धोरणे आणि धोरणात्मक उपक्रमावर लक्ष केंद्रित करतील. त्यांच्या सहभागामुळे विद्यापीठाचा सार्वजनिक धोरण आणि नियामक चौकटींशी संबंध अधिक दृढ होईल अशी अपेक्षा आहे.

डॉ. पी. ए. इनामदार विद्यापीठाने शिक्षण, आर्किटेक्चर, कॉमर्स आणि फार्मास्युटिकल सायन्स या सारख्या क्षेत्रांमध्ये विविध नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम उपलब्ध करुन दिले आहे. विद्यापीठ दर्जेदार शिक्षणावर भर देते. समर्पित सुविधांद्वारे इनोव्हेशन आणि संशोधनाला प्राधान्य देते. डॉ. पी ए इनामदार विद्यापीठाच्या वतीने रंगून वाला डेंटल कॉलेज, युनानी कॉलेज आणि हॉस्पिटल व फिजीओथेरपी कॉलेज चालवले जाते.

अली दारुवाला हे रुबी हॉल हॉस्पिटलचे सल्लागार म्हणूनही काम करतात.
तसेच ते भाजपचे प्रवक्ते असून ऑल इंडिया पेट्रोल डिलर्स असोएिशनचे प्रवक्ता म्हणून कार्यरत आहेत.
अल्पसंख्याक आयोगाचे ते राष्ट्रीय सल्लागार आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

पोलीसनामाच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/policenamaa

Pune Police Tadipari Action | जबरी चोरी करणार्‍या सराईत गुंडाला 2 वर्षासाठी केले तडीपार

Maharashtra Assembly Election 2024 | फलटणच्या राजकारणात मोठ्या घडामोडी ! संजीवराजेंसह आमदार दीपक चव्हाण शरद पवार गटात प्रवेश करणार; रामराजेंचा मात्र वेगळा निर्णय; म्हणाले – ‘भाजपच्या विचारसरणीशी भांडण नाही पण …’

Pune Pimpri Chinchwad Crime News | मोबाईलचे पैसे मागितल्याने तरुणाचा खून; तेलंगणात पळून जाण्याच्या तयारीत असलेले आरोपी जेरबंद (Video)

Total
0
Shares
Related Posts
Satish Wagh Murder Case

Satish Wagh Murder Case | पुणे : आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या पूर्वीच्या भाडेकरुने पाच महिन्यापूर्वी दिली होती सुपारी; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती आली समोर