समुद्रकिनारी होणार अली फजल आणि ऋचा चड्ढाचं ‘वेडिंग’ रिसेप्शन, ‘या’ दिवशी करणार लग्न, तयारी सुरू

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार अली फजल आणि ऋचा चड्ढा फुकरे(Fukrey) सिनेमात एकमेकांचे जानी दुश्मन होते. 2012 साली आलेल्या फुकरे सिनेमा दरम्यान अली आणि ऋचाची मैत्री झाली. यानंतर 2015 मध्ये दोघे एकमेकांना डेट करू लागले. सुरुवातीला तर दोघांनी आपलं नातं लपवण्याचा खूप प्रयत्न केला परंतु डेटींगच्या अफवा समोर आल्यानंतर मात्र 2017 साली त्यांना जगासमोर आपल्या नात्याबद्दल समहती दाखवावी लागली. यानंतर सर्वांनाच समजलं की, दोघंही या नात्याला घेऊन किती गंभीर आहे.

https://www.instagram.com/p/B7v1H6DJ3r3/

मालदीवमध्ये असताना अली फजलनं ऋचाला लग्नासाठी प्रपोज केलं होतं. ऋचानंही विलंब न लावता अलीला लग्नसाठी होकार दिला होता. अलीकडेच अशी माहिती समोर आली होती की, अली आणि ऋचा 15 एप्रिल रोजी लग्न करण्याचं मन बनवत आहेत. लग्नाच्या काही काळ आधीच कपलनं आपल्या लग्नाच्या बातमीवर शिक्कमोर्तब केलं आहे.

https://www.instagram.com/p/B7dKrZnD9pw/

एका मुलाखातीत अली आणि ऋचा दोघांनाही खुलासा केला आहे की, दोघं दिल्लीत लग्न करणार आहेत. यावेळी दोघांचे कुटुंबीय आणि खास मित्रच उपस्थित असणार आहेत. लग्नानंतर कपल दिल्लीतच एक शानदार रिसेप्शन देणार आहे.

https://www.instagram.com/p/B7aR5AqDnEA/

मुंबईसाठीदेखील दोघांनी खास प्लॅनिंग केलं आहे. दोघे मुंबईच्या समुद्रकिनारी लग्नाचं सेलिब्रेशन करणार आहेत. त्यांना आपल्या लग्नाचे क्षण अविस्मरणीय करायचे आहेत. त्यांना समुद्रकिनारा असणाऱ्या वेन्यूची प्रतिक्षा आहे. 15 एप्रिलला लग्न केल्यानंतर मुंबई रिसेप्शन 21 एप्रिल रोजी होणार आहे.

https://www.instagram.com/p/B5xrRCZjNIX/

https://www.instagram.com/p/B5C77yJjLkN/

https://www.instagram.com/p/B4cZd6mDr8L/

https://www.instagram.com/p/BvTUZvsDEf1/