‘मिर्झापूर’मधील ‘गुड्डू भैया’ करायचा कॉल सेंटरमध्ये काम ! ‘एवढी’ होती पहिली सॅलरी

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार अली फजल (Ali Fazal) यानं त्याच्या पहिल्या नोकरीबद्दल आणि स्ट्रगलबद्दल सांगितलं आहे. सोशलवर त्यानं याबाबत माहिती दिली आहे.

एवढी होती अली फजलची पहिली सॅलरी

अली फजलनं ट्विट केलं हे की, त्याची पहिली सॅलरी ही 8 हजार होती. हा पैसा त्याला 19 वर्षांचा असताना कॉल सेंटरमधील कामासाठी मिळाला होता. त्यावेळी अली कॉलेजात शिकत होता आणि फी भरण्यासाठी तो कॉल सेंटरचं काम करत होता.

ट्विटरवर एक ट्विट चेन सुरू आहे. यात यूजर आपली पहिली सॅलरी सांगत आहे. वय आणि कोणतं काम केलं होतं याचाही खुलासा करत आहेत. डायरेक्टर अनुभव सिन्हा (Anubhav Sinha)नंदेखील याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, 18 वर्षांचे असताना ते 7 वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची ट्यूशन घेऊन 80 रुपये कमावत होते. त्यावेळी ते इंजिनियरिंगला होते. स्मोकिंगचं व्यसन पूर्ण करण्यासाठी त्यांनी हे पैसे कमावले होते, असंही त्यांनी सांगितलं आहे.

अलीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर श्रिया सारन हिचा हिंदी आणि इंग्रजीत आलेल्या (The Other End of the Line) या सिनेमात पहिल्यांदा काम केलं होतं. 2008 साली हा सिनेमा रिलीज झाला होता. 2011 साली तो ऑलवेज कभी कभी सिनेमात लिड रोलमध्ये दिसला होता. 2013 मध्ये आलेल्या फुकरे सिनेमातून त्याला ओळख मिळाली. मिर्झापूर या वेब सीरिजच्या दोन्ही सीजनमध्ये काम केल्यानंतर आता त्याची लोकप्रियत गगनाला भिडली आहे. त्याची गुड्डू पंडित अर्थात गुड्डू भैया ही भूमिका खूप गाजली आहे.