#VideoViral : आलियाच्या तोंडात असतं सारखंच रणबीरचं नाव, वरुणला म्हटली रणबीर…आणि…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कलंकची स्टारकास्ट सध्या सिनेनमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याचं दिसत आहे. बुधवार(दि 17 एप्रिल) रोजी कलंक सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. सध्या आलिया, वरुण, सोनाक्षी आणि आदित्य यांचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. त्यात दिसत आहे की आलिया वरुणला रणबीर बोलताना दिसत आहे. एका मुलाखतीतील हा व्हिडीओ आहे असे दिसत आहे.

आलियाने वरुणऐवजी रणबीरचे नाव घेतल्यानंतर तेथे उपस्थित सर्वच हसू लागतात. त्यांना आपलं हसणं कंट्रोल होत नाही. सध्या आलियाचं हे व्हिडीओ झपाट्याने व्हायरल होताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, वरुण आलियाचे केस ओढत आहे. आणि एकदमच आलिया म्हणते, ‘रण… वरुण मत करो’ यानंतर सर्वजण हसू लागतात. यानंतर आलिया लाजतानाही दिसत आहे. ती लाजल्यानंतर वरुण तिला हसत हसत जवळ घेतानाही दिसत आहे.

आलिया आणि रणबीर कपूर यांचं रिलेशनशिप हे जगजाहीर आहे. दोघेही मागील एका वर्षापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. हे दोघेही एकत्र काम करत असलेला सिनेमाही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अयान मुखर्जी या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत.

Loading...
You might also like