Alia Bhatt | “…म्हणून मी गरोदर असल्याचं सगळ्यांपासून लपवलं”, आलिया भट्टने केला मोठा खुलासा

पोलीसनामा ऑनलाइन : सध्या बॉलीवूडमध्ये अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हिच्या गोंडस मुलीचीच चर्चा दिसत आहे. नुकताच रणबीर कपूर व आलिया भट्ट आईबाबा झाले आहेत. कपूर कुटुंबासाठी खूप आनंदाची बाब आहे. गरोदर असतानाही आलिया भट्टने (Alia Bhatt) चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान बेबी बंब फ्लॅट करताना दिसून आली. नुकताच आलियाने एका मुलाखतीत तिचा प्रेग्नेंसी काळातील अनुभव सांगितला आहे.

आलियाने नुकताच एका मुलाखतीत प्रेग्नेंसी दरम्यान तिला जाणवलेल्या गोष्टीं भाष्य केले आहेत. यावेळी ती म्हणाली, “माझी प्रेग्नेंसी अनपेक्षित होती. त्यामुळे माझे शरीर मला काय सांगत आहे याकडे मला लक्ष द्यायचे होते. काम देखील तेवढेच महत्त्वाचे होते. त्याबरोबर माझे शरीर आणि माझ्या पोटातील बाळ हे फार महत्त्वाचे होते. त्यामुळे मी प्रथम प्राधान्य त्यांना दिले. मात्र सुदैवाने गरोदरपणात शारीरिक त्रासामुळे माझं काम काही मागे पडले नाही. सुरुवातीच्या काळात मला थोडासा त्रास झाला. खूपच अशक्तपणा, दम लागणे आणि मळमळ या गोष्टी जाणवत होत्या. मात्र मी तेव्हा कोणालाच काही बोलले नाही”.

पुढे बोलताना आलिया (Alia Bhatt) म्हणाली, “मी माझ्या प्रेग्नेंसी बद्दल तीन महिन्यापर्यंत तरी कोणाशीच
काही भाष्य केले नाही. कारण असे म्हणतात की पहिले 12 आठवडे गरोदरपणात कोणालाही काही सांगायचं नसतं.
म्हणूनच मी मला होणारा त्रासाबद्दल ही कोणासमोर भाष्य केले नाही.
शूटिंगच्या दरम्यान मी अनेकदा माझ्या व्हॅनिटी व्हॅन मध्ये आराम करत होते.
तर जानेवारी 2022 मध्येच मी ‘हार्ट ऑफ स्टोन’ हा माझा पहिला हॉलीवुड चित्रपट साइन केला होता.
गरोदरपणा दरम्यान मी पहिला ॲक्शन चित्रपट शूट केला आहे”.
आलिया आणि रणबीर हे दोघेही 14 एप्रिल 2022 रोजी विवाह बंधनात अडकले आणि अवघ्या काही
महिन्यातच त्यांनी आई-बाबा होणार ही गोड बातमी चाहत्यांना दिली.
तर 6 नोव्हेंबर रोजी आलियाने एक सुंदर मुलीला जन्म दिला त्याचे नाव ‘राहा’ असे ठेवण्यात आले आहे.

Web Title :-  Alia Bhatt | actress alia bhatt reveals why she didnt tell about her pregnancy news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shamna Kasim | आलिया भट्टनंतर आता ‘या’ अभिनेत्रीने दिली गुड न्यूज; लग्नाच्या तीन महिन्यातच दिली गुड न्यूज

Jitendra Awhad | ‘औरंगजेब क्रूर आणि हिंदूद्वेष्टा असता तर…’ वादग्रस्त वक्तव्यावर सारवासारव करताना जितेंद्र आव्हाड पुन्हा चुकले, म्हणाले…