Alia Bhatt | आलियाच्या लेकीला मिळाली ‘ही’ खास भेटवस्तू; फोटो शेअर करत दिली माहिती

पोलीसनामा ऑनलाईन टीम : दीड महिन्यापूर्वी बॉलिवूड अभिनेता- अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला. तेव्हापासून आलिया (Alia Bhatt) मातृत्वाचा आनंद घेत आहे. आई झाल्यानंतर अनेकदा ती तिचे फोटो शेअर करत असते. तसंच त्या फोटोंमधून ती मातृत्व कशी एन्जॉय करत आहे हे आपल्या चाहत्यांसोबत शेअर करताना दिसत आहे. नुकतीच तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
आलिया-रणबीरची मुलगी ‘राहा’च्या जन्मानंतर कपूर कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. तिला भेटण्यासाठी अनेकजण येत आहेत. राहाची झलक पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. यादरम्यान राहासाठी एका व्यक्तीने भेटवस्तू म्हणून बेडसेट दिला आहे. याबाबत आलियाने पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. बेडसेटचा फोटो शेअर करत तिने लिहिले कि “सर्वात सुंदर बेडसेटबद्दल खूप खूप धन्यवाद रिहा मावशी,.”
आलियाच्या (Alia Bhatt) गरोदरपणात ती बाळाच्या जन्मानंतर वर्षभर तरी काम करणार नाही अशी चर्चा रंगली होती.
पण आलियाने वेगळाच विचार करत राहाच्या जन्माच्या तीन महिन्यानंतर ती नव्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे.
आलिया लवकरच संजय लीला भन्साळी यांच्या ‘बैजू बावरा’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे.
Web Title :- Alia Bhatt | alia bhatt daughter raha recevied bedset gift actress shared post
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update