Alia Bhatt | अनुष्का आणि आदित्यच्या लग्नात ‘या’ कारणामुळं आलिया भट्ट झाली ट्रोल (Video)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Alia Bhatt | बाॅलिवूड अभिनेत्री अनुष्का रंजन (Anushka Ranjan) हिने अभिनेता आदित्य सीलसोबत (Aditya Seal) विवाह (Marriage) पार पाडला आहे. सध्या बाॅलिवडूमध्ये लग्नाचा सीझन सुरु आहे. नुकतच राजकुमार रावचं (Rajkumar Rao) लग्न पार पडलं आहे. त्यानंतर आता अनुष्का आणि आदित्य यांचा विवाह 21 नोव्हेंबर रोजी पार पडला. त्यांच्या लग्न समारंभात मोठ-मोठ्या बाॅलिवूड कलाकारांनी चार चांद लावले. यावेळी अभिनेत्री आलिया भट्टने (Alia Bhatt) एक डान्स सादर केला.

 

अनुष्का आणि आदित्यच्या लग्न समारंभात मोठ्या जल्लोषात संगीत आणि अनेक कार्यक्रम पार पडले.
यावेळी संगीतमध्ये आलिया भट्टने (Alia Bhatt) ‘सिंघम’ (Singham)मधील ‘छलका-छलका’ (Jhalka-Jhalka) या गाण्यावर ठुमके मारले.
या डान्सचा व्हिडीओ सेलिब्रेटी फोटोग्राफर विरल भैयानीने (Viral Bhaiyani) त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला.
तर या व्हिडीओवर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रीया दिल्या आहेत.
यावेळी अनेकांना आलियाचा डान्स आवडला नसल्याच्या कमेंट्स लोकांनी केल्या आहेत.
एवढच नाही तर एका युझरला तर तिने निवडलेलं गाण सुद्धा आवडलं नाही.

अनुष्का आणि आदित्यच्या लग्नातील आलियाचा डान्स मोठ्या प्रमाणात लोकांना आवडला नसला तरी अनेकांना तिचा डान्स आवडला आहे.
मात्र आलिया सर्वात जास्त ट्रोल झाली ते तिच्या ड्रेसमुळे. लग्नात आलियाने पिवळ्या रंगाचा ल्हेंगा (Yellow Lhenga) परिधान केला आहे.
या ल्हेंगाचा ब्लाऊज खूप ट्रेंडी आहे. त्यामुळे तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं आहे.

 

नवीन लग्न झालेल्या अनुष्काने ‘वेडिंग पुलाव’ (Wedding Pulaw) या चित्रपटातून बाॅलिवूड डेब्यू दिला होता.
त्यानंतर तिने ‘बत्ती गुल मीटर चालू’ (Batti Gul Meter Chalu) या चित्रपटात अभिनेता शाहीद कपूरसोबत (Shahid Kapoor) सहकारी भूमिका साकरली होती.
तसेच आदित्य सीलने ‘इंदू की जवानी’ (Indu Ki Jawani), ‘स्टुडंट ऑफ द इअर 2’ (Student Of The Year) आणि ‘तुम बिन 2’ (Tum Bin 2) या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

 

Web Title : Alia Bhatt | alia bhatt got trolled for her dance performance in aushka ranjan and aditya seal wedding marathi news policenama

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

खुशखबर ! Aadhaar मध्ये अ‍ॅड्रेस बदलणे झाले सोपे, देशभरात उघडणार 166 सेवा केंद्र; ‘या’ पध्दतीची असेल सुविधा, जाणून घ्या

Pune Corporation | कात्रज परिसरातील पाणी पुरवठा सुरळीत करावा; नगरसेवक प्रकाश कदम यांची सर्वसाधारण सभेत मागणी

Aryan Khan Drugs Case | आर्यन खान प्रकरणात एका तपास यंत्रणेचे थोबाड फुटले; शिवसेनेची भाजपवर बोचरी टीका