पोलीसनामा ऑनलाइन : Alia Bhatt | बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये अभिनेत्री आलिया भट्ट हिचे नाव देखील आवर्जून घेतले जाते. सध्या आलियाने एका चिमुकलीला जन्म दिला आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये तिने मुलीला जन्म दिला. तिच्या मुलीचे नाव राहा असे ठेवण्यात आले. सध्या आलिया राहा सोबत पूर्ण वेळ घालवताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर आलियाचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये ती Oops Moment पासून वाचण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. (Alia Bhatt)
आलिया तिच्या मुलीच्या जन्मानंतर फारच चर्चेत होती. आलिया आणि रणबीर जास्तीत जास्त वेळ मुलगी राहा सोबत घालवताना दिसत असतात. आलियाने एका कार्यक्रमादरम्यान वरून धवण सोबत उपस्थिती लावली होती. यावेळी प्रेग्नेंसी नंतर आलिया पहिल्यांदाच एवढी बोल्ड दिसून आली होती. शिवाय तिने परिधान केलेल्या ड्रेस मध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. मात्र या ड्रेसमध्ये ती कम्फर्टेबल नसल्याचे दिसत होते. व्हिडिओमध्ये दिसत आहे कि आलिया सतत आपला हात मांडीवर ठेवून काहीतरी झाकण्याचा प्रयत्न करत आहे. तर आलियाच्या या व्हिडिओने सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. (Alia Bhatt)
या कार्यक्रमात पत्रकारांनी आलियाला राहाचा जन्मानंतर तिच्या करिअरवर परिणाम होऊ शकतो का? असे विचारले असता आलिया म्हणाली, “हो हे शक्य आहे. माझ्या आयुष्यात सगळ्यात पहिली प्रायोरिटी ही माझी मुलगी आहे. मात्र माझे पहिले प्रेम चित्रपट आहे आणि ते माझे काम देखील आहे. त्यामुळे मी प्रयत्न करेन की दोन्ही गोष्टी व्यवस्थित रित्या हाताळू शकेन. कदाचित येणाऱ्या काळात माझे काम हे क्वांटिटी पेक्षा क्वालिटीला प्राधान्य देणारे असेल माझ्या मताने यात काहीच चुकीचे नाही”.
आलियाच्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाल्यास ती लवकरच करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात ती रणवीर सिंग सोबत दिसणार आहे. या व्यतिरिक्त ती ‘जी ले जरा’ या चित्रपटात देखील दिसून येणार आहे. तर या चित्रपटात आलीया सोबत प्रियंका चोप्रा आणि कतरीना कैफ देखील दिसणार आहेत. त्याशिवाय आलिया हॉलीवुड चित्रपट ‘हार्ट ऑफ स्टोन’ मध्ये देखील झळकणार आहे. आलियाचा हा पहिला हॉलिवूड चित्रपट आहे.
Web Title :- Alia Bhatt | alia bhatt oops moment undergarment video viral
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Maharashtra MLC Election Results | ‘सत्यजीत तांबे जिंकले तरीही तो भाजपचा विजय नसेल…;’ – जयंत पाटील
Pune Crime News | ‘आरोपी पकडा अन् बक्षीस मिळवा’, कोयता गँगच्या दहशतीमुळे पुणे पोलिसांची अनोखी योजना