Alia Bhatt | आलियाने शेअर केला मुलीच्या जन्मानंतरचा पहिला फोटो, पण लोकांनी केली ‘ही’ मागणी

पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने (Bollywood Actress Alia Bhatt) 6 नोव्हेंबरला एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. दरम्यान आई झाल्यानंतर अभिनेत्री आलियाने स्वत:चा पहिला फोटो इंस्टाग्रामवर (Actress Alia Bhatt Instagram Photo) शेअर केला आहे. तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती हातात कप धरताना दिसत आहे.

 

तसेच या फोटोला तिने एक कॅप्शन देखील दिले आहे. कॅप्शन देताना तिने लिहिले आहे की, “कृपया सांगा की या कपवर ‘मम्मा’ लिहिलेले आहे.” महत्वाची बाब म्हणजे या फोटोमात्रमध्ये आलिया भट्टचा (Bollywood Actress Alia Bhatt) चेहरा दिसत नाही. चित्रात त्याने स्वतःला अस्पष्ट केले आहे. हा फोटो शेअर (Actress Alia Bhatt First Photo) करत आलिया भट्टने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘ही मी आहे.’

 

खरतर पाहिल गेल तर लोकांना चित्रपटसृष्टी असो किंवा राजकारण असो या क्षेत्रातील लोकांच्या खाजगी आयुष्याबद्दल जाणुन घेण्यात चांगलाच रस असतो. दरम्यान अशातच आता चाहते आलिया भट्ट्च्या मुलीची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक आहेत. तसेच आता आलियाने आई झाल्यानंतर पहिल्यांदाच तिचा स्वत:चा एक फोटो शेअर (Share Photos) केला आहे. त्यामुळे तिचा फोटो तर चाहत्यांना आवडलाच ,पण चाहत्यांनी आता आलिया भट्टला बाळाची पहिली झलक दाखवण्याची मागणी केली आहे.

तसेच याआधी म्हणजे 6 नोव्हेंबरला आलिया भट्टने मुलीच्या जन्माची आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर करत लिहिले,
‘आमच्या आयुष्यातील सर्वात चांगली बातमी – आम्हाला एक बाळ आहे… आणि ती एक जादुई मुलगी आहे’.
तसेच या पोस्टसह आलियाने एक फोटो शेअर केला आहे.या फोटोमध्ये सिंहांच्या कुटुंबाचे स्केच देखील शेअर केले होते.
ज्यामध्ये सिंह आपल्या सिंहिणी आणि मुलासोबत दिसत होता.

 

Web Title :-  Alia Bhatt | alia bhatt shared her first photo after daughter birth pic goes viral on social media

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Delhi Crime | ‘डेक्सटर’ वेब सिरीज पाहून प्रियसीचे केले 35 तुकडे; वसईच्या श्रद्धा वालकरचे खून प्रकरण

Bhumi Pednekar | “वाह, काय ती सुंदरता..”, भूमी पेडणेकरचे लेटेस्ट फोटो पाहुन होताल घायाळ, पहा फोटो एका क्लिकवर

Dhananjay Munde | ‘भाऊ असे पर्यंत बहिणीचा चेक बाऊन्स होणार नाही…’; धनंजय मुंडेंचे पंकजाताईंना आश्वासन