Alia Bhatt | आलिया भट्टच्या आजोबांचे वृद्धापकाळाने निधन; सोशल मीडियावर भावनिक पोस्ट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Alia Bhatt | बॉलीवुडची (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट (Actor Alia Bhatt) हिच्या आजोबाचे वयाच्या 95 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. आलियाची आई अभिनेत्री सोनी राजदान (Actor Soni Razdan) यांचे वडील नरेंद्रनाथ राजदान (Narendranath Razdan) होते. आलियाचे आजोबांवर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital, Mumbai) उपचार सुरू होते. आलिया आणि सोनी राजदान यांनी नरेंद्रनाथ यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.

 

Advt.

 

आलिया भट्टने आपल्या आजोबांसोबतचा एक व्हिडीओ शेअर करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. या व्हिडीओखाली तिनं कॅप्शन लिहीले आहे की, ‘माझे आजोबा. माझे हिरो, ते 93 वर्षाचे असताना गोल्फ खेळत होते, वयाच्या 93 वर्षापर्यंत त्यांनी काम केले, ते चविष्ट ऑम्लेट बनवत होते. त्यांनी आम्हाला उत्तम गोष्टी सांगितल्या, आपल्या नातवासोबत ते खेळायचे, त्यांनी कुटुंबावर प्रेम केले.’ या व्हिडीओमध्ये नरेंद्रनाथ राजदान हे केक कट करताना दिसत आहेत. मसाबा गुप्ता (Masaba Gupta), करण जोहर (Karan Johar), दिया मिर्झा (Dia Mirza) या सेलिब्रिटींनी आलियानं शेअर केलेल्या व्हिडीओला कमेंट करुन नरेंद्रनाथ राजदान यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. (Alia Bhatt)

 

तसेच आलियाची आई अभिनेत्री सोनी राजदान यांनी त्यांच्या वडिलांचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं, ‘डॅडी, ग्रँडपा, निंदी तुम्ही आमच्यासाठी पृथ्वीवरील एका एंजल सारखे होता.’

 

 

काही दिवसांपूर्वी आलिया आयफा पुरस्कार सोहळ्यासाठी (IIFA Awards Function) जाताना तिला तिच्या आजोबांच्या बिघडलेल्या
तब्येतीची माहिती मिळाली. आजोबांची तब्येत बिघडल्याची माहिती मिळताच ती विमानतळावरून पुन्हा घरी परतली होती.

 

आलिया भट्ट चा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) हा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
या चित्रपटात आलियासोबतच रणवीर सिंह (Ranveer Singh) देखील प्रमुख भूमिका साकारणार असून आलियाने राणी ही भूमिका साकारली आहे.
हा चित्रपट 28 जुलै 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. (Alia Bhatt’s grandfather Death)

 

Web Title :  Alia Bhatt | Alia Bhatt’s grandfather dies of old age; Emotional posts on social media

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा