रणबीर, आलिया आणि इतर भावंडांसोबतचा फोटो शेअर करत करिष्मा कपूर म्हणाली ‘असे’ काही

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – आलिया भट्ट आणि रणबीर कपूर सध्या काही दिवसांपासून आपल्या चित्रपटापेक्षा रिलेशनशिपला घेऊन चर्चेत आहेत. आलिया सध्या काही दिवसांपासून रणबीर सोबत दिसून येते आहे. कपूर आणि भट्ट कुटुंब देखील एकमेकांच्या जवळ आहेत. रणबीरची आई नीतू कपूरला आलिया भट्ट खूप आवडते. आता रणबीर च्या भाऊ -बहिणींनी सुद्धा तिला आपलं मानला आहे. नुकताच काही दिवसांपूर्वी रणबीर कपूर आपल्या भावा- बहिणींसोबत डिनरसाठी गेला होता. त्यावेळी त्याचसोबत आलिया भट्ट सुद्धा होती. या डिनर पार्टी मध्ये करिश्मा कपूर, अरमान जैन आणि आदर जैन आले होते.

या वेळी अरमान गर्लफ्रेंड अनीशा मल्होत्रा सोबत आला होता. करिश्मा कपूरने आपल्या भावा- बहिणींसोबत असतांनाचे फोटोज सोशल मीडियावर शेयर केले आहेत. इंस्टाग्राम वर हा फोटो टाकतांना करिश्माने दिल वाला इमोजी टाकले आणि लिहिले ‘भावा- बहिणीं’. यासोबतच करिश्माने लिहिले की, मी सैफ आणि करीना कपूर खानला खूप मिस करते आहे. आलिया आणि रणबीर चा नात्याला १ वर्ष पूर्ण झाले आहे. खूप दिवसांपासून त्यांनी आपले नाते लपवून ठेवले होते परंतु ते दोघे आता त्यांच्या रिलेशनशिपबद्दल सगळ्यांना सांगत आहेत.

काही दिवसांपासून त्यांच्या दोघांच्या लग्नाच्या बातम्या येत आहेत. यावर आलियाने सांगितले, ” मी आता लग्न करू इच्छित नाहीये, जेंव्हा मी लग्न करेल तेंव्हा सगळ्यांना माहित होईल. मी बांद्रा बँडस्टँड आणि गेटी गॅलेक्सी यांना सांगू इच्छिते की मी लग्न करणार आहे.