अभिनेत्री आलिया भट्टने इव्हेंटमध्ये दिली ‘शिवी’, ‘बेबो’ करीना म्हणते – ‘हे आजकालच्या जनरेशनचे स्टार्स’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – जिओ मामी फिल्म फेस्टीवल 2019 मध्ये अभिनेत्री करीना कपूर खान आणि आलिया भट्टने स्पेशल सेगमेंटमध्ये करण जोहरसोबत अनेक मुद्द्यांवर गप्पा मारल्या. आलिया आणि करीना दोघींनीही एकमेकींची स्तुती केली. इव्हेंटमध्येच एक वेळी अशी आली की, आलिया तोंडातून शिवी निघते.

आलिया करीनाच्या फॅशनेबल लुकची स्तुती करते. यावेळी चुकून तिच्या तोंडातून शिवी निघते. यानंतर ती आपल्या तोंडाला हात लावते आणि हसायला लागते. यानंतर करीना आणि करण हेदेखील हसायला लागतात. करीना म्हणते, “हे काय चाललंय.” गंमत करत करण म्हणतो, “मी तुला असं मोठं केलंय ?” आलिया म्हणते, “जेव्हा तुम्ही भावनेच्या भरात असता तेव्हा अस होत असतं.”

https://www.instagram.com/p/B3kKQ1qFFjx/

आलिया पुढे म्हणते, “प्लीज हे फुटेज कुठे टाकू नका. मला ट्रोलिंगची खूप भीती वाटते. मी नेहमीच ट्रोल होत असते. मी नॉर्मल आहे. कधी कधी वाईट सवयी लागत असतात.”

https://www.instagram.com/p/B3j5bYhFVFy/

जेव्हा वरुण धवनने दिली आलिया भट्टला शिवी
इव्हेंटमध्ये अचानक वरुण धवनचा कॉल येतो. करणला आलेला हा कॉल आलिया उचलते. आलिया म्हणते, “VD आम्ही मामी फिल्म फेस्टीवल मध्ये आहोत. तू स्पीकरवर आहेस. काही तरी शहाणपणाच्या गोष्टी कर.” परंतु वरुणला खरंच वाटत नाही. तो गंमत करत शिवी देतो. यानंतर आलिया स्पीकर ऑफ करून त्याला म्हणते, “आम्ही खरंच मामी फिल्म फेस्टीवलमध्ये आहोत.” यावेळी चिमटा काढत करीना म्हणते, “तुम्ही पाहू शकता ही आजकालची जनरेशन कशी आहे.”

https://www.instagram.com/p/B3j5C1HFuHK/

https://www.instagram.com/p/B3b6rMcFSme/

https://www.instagram.com/p/B3ZZ-N3lBlD/

https://www.instagram.com/p/B3Piw79lI0T/

https://www.instagram.com/p/B3OV10tFaeU/

https://www.instagram.com/p/B3EiYMDFSOq/

https://www.instagram.com/p/B21pJWhFC4X/

 

Visit : Policenama.com