रात्री 3 वाजता बॉयफ्रेन्डच्या घरातून परतण्याची इच्छा होती आलिया भट्टची, नशेमध्ये टूल झालेला ‘बॉडीगार्ड’ आला अन्, नंतर…

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – आपल्याला वाटते की, काही विचित्र घटना सामान्य व्यक्तींसोबतच घडत असतात पण असे नाही. बॉलिवूडच्या कलाकारांना देखील अशा घटनेला सामोरे जावे लागते. अशीच एक घटना बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टसोबतही घडली होती ज्यामुळे ती खूप घाबरली होती. ही गोष्ट काही वर्षांपूर्वीची आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आलिया रात्री उशिरा तिच्या एक्स प्रियकर सिद्धार्थ मल्होत्रा याच्या घरी जाण्यासाठी एकटी घराबोहर पडली होती. तिच्यासोबत तिचा बॉडीगार्ड नव्हता. सिद्धार्थच्या घरातून परत येत असताना आलियाला उशीर झाला होता. रात्री 3 वाजता आलियाला एकटे परत यायचे नव्हते.

सिद्धार्थच्या घरी वेळीच पोहोचायला हवं, असे तिने पहिलेच आपल्या बॉडीगार्डला सांगितले होते पण तो आला नाही. आलियाने बर्‍याचदा फोन केल्यानंतर, जेव्हा तिचा बॉडीगार्ड सिद्धार्थच्या घरी पोहोचला तेव्हा आलियाला समजले की, बॉडीगार्ड दारूच्या नशेत आहे.

आलिया त्याच्याबरोबर घरी परत आली, पण आलिया त्याला पाहून इतकी घाबरली की तिला काहीच बोलण्याची किंवा ओरडण्याची हिम्मत नव्हती. घरी आल्यावर आलियाने ती सर्व गोष्ट आई सोनी राजदान यांना सांगितली आणि आईने त्वरित बॉडीगार्डला नोकरीवरून काढून टाकले. तथापि, आलिया किंवा सोनी यांच्याकडून या बातमीची कोणतीच पुष्ठी झाली नव्हती. पण याची बरीच चर्चा झाली होती.