आलिया करतेय ‘या’ कारणामुळे माधुरीचं कौतुक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – दिग्दर्शक करण जोहरचा आगामी चित्रपट ‘कलंक’ सध्या चर्चेच आहे. त्यामुळे प्रेक्षकीही या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात चांगलीच मोठी स्टार कास्ट आहे. तसंच या चित्रपटातील ‘घर मोरे परदेसिया’ हे गाणं प्रदर्शित झालं. या गाण्यानंतर प्रेक्षकांची आतुरता अधिक वाढली आहे. या गाण्यात आलिया भट्ट आणि माधुरी दीक्षित एकत्र दिसत असून त्यांच्यात मस्त जुगलबंदी पाहायला मिळत आहे. आलियाने माधुरीसोबत काम केल्याचा अनुभव नुकताच सांगितला आहे.

‘घर मोरे परदेसिया’ गाणं आल्यानंतर सोशल मीडियावर दोघींच्या नावाची चर्चा आहे. गाण्यात आलिया आणि माधुरी यांनी नृत्याचं उत्तमरित्या सादरीकरण केलं आहे. माधुरीच्या नृत्याचे कौतुक नेहमीच केले जाते मात्र, आलियाचे नृत्य पाहून आलियावरही कौतुकांचा वर्षाव होतं आहे.

आलियाने माधुरीसोबत काम करतानाचा अनुभव सांगताना तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. माधुरी दीक्षित यांचं नृत्यकौशल्य साऱ्यांनाच माहित आहे. बॉलिवूडमधील अग्रगण्य नृत्यांगना म्हणून त्यांच्याकडे आजही पाहिलं जातं. त्यांच्या नृत्याची एक खास शैली आहे. डान्स करत असताना त्यांचे हावभावही पाहण्याजोगे असतात. थोडक्यात सांगायचं झालं तर डान्स स्टेप्सपासून ते हावभावापर्यंत त्याचं सगळं काही परफेक्ट असतं. त्यांच्यासोबत मला काम करण्याची संधी मिळाली हे माझं भाग्यचं आहे, असं आलियाने सांगितलं.

चित्रीकरण असो किंवा डान्सची एखादी स्टेप, त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं. प्रत्येक टप्प्यावर त्यांनी मला मार्गदर्शन केले. डान्स करत असताना स्पिन करणं खूप अवघड होतं. त्यामुळे मला ते जमेल की नाही हा मोठा प्रश्न माझ्यासमोर होता. मात्र, या भागाचं चित्रीकरण झाल्यानंतर मी ते परफेक्ट केल्याचं मला माधुरी मॅमने सांगितलं, असं आलियाने म्हटलं.

दरम्यान, ‘कलंक’ चित्रपटात माधुरी दीक्षित, संजय दत्त, आलिया भट, वरूण धवन, आदित्य रॉय कपूर आणि सोनाक्षी सिन्हा अशी तगडी स्टारकास्ट आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. १९ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र, ही तारीख बदलून फिल्ममेकर्सने दोन दिवस आधीच प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ‘कलंक’ १७ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.