आलियानं वॉलपेपरला ठेवला रणबीर कपूरचा फोटो ? (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम  – बॉलिवूड स्टार आलिया भट बुधवारी रात्री आपली फ्रेंड आकांक्षा रंजनचा सिनेमा गिल्टीच्या स्पेशल स्क्रिनिंगसाठी गेली होती. आलिया आपली आई सोनी राजदानसोबत आली होती. यावेळी आलिया तर सेंटर ऑफ अ‍ॅक्ट्रशन ठरली. परंतु तिचा फोनही अटेंशनचं कारण ठरला. तिच्या फोननंही साऱ्यांचं अटेंशन घेतलं.

थिएटरकडे जाताना आलियाच्या हातात तिचा मोबाईल होता. यावेळी तिच्या फोनची लाईटही ऑन होती. यावेळीचा तिचा वॉलपेपरही दिसला. यात एक कपल दिसत होत. एक मुलगा आणि एक मुलगी. यानंतर अशी चर्चा सुरू झाली की, आलियानं तिचा आणि रणबीरचा फोटो वॉलपेपर म्हणून ठेवला आहे.

आलिया भट आणि रणबीर कपूर दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघं अनेकदा एकत्र टाईम स्पेंड करताना दिसत असतात. लवकरच दोघं लग्न करणार असल्याच्याही बातम्या समोर येताना दिसल्या आहेत. परंतु अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली दिसत नाही.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ही जोडी अयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्र या सिनेमात काम करताना दिसणार आहे. याशिवाय आलिया भट करण जोहरच्या तख्त सिनेमातही दिसणार आहे. रणबीर कपूरकडे शमशेरा हा सिनेमादेखील आहे.