Alia Bhatt – Ranbir Kapoor Marriage First Photos | आलियाला नवरीच्या रूपात पाहून रणबीरची नजर हटेना, अखेर पहिल्यांदाच आलिया आली ‘मिसेस कपूर’ म्हणून जगासमोर..

पोलीसनामा ऑनलाइन टीम | अखेर अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर (Alia Bhatt – Ranbir Kapoor Marriage First Photos) आज 14 एप्रिल रोजी लग्नबंधनात अडकले आहे. त्या दोघांचे लग्न थाटामाटात पार पडलं असून, अनेक दिग्गज कलाकारांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती. अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt ) आता अधिकृतपणे मिसेस कपूर म्हणून ओळखली जाणार आहे (Alia Bhatt – Ranbir Kapoor Marriage First Photos).

 

 

आलिया भट्टनं खुद्द आपल्या इंन्टाग्रामच्या अकाउंटवर लग्नाचे काही फोटो (Alia Bhatt – Ranbir Kapoor) शेअर केले आहेत. फोटोमध्ये लग्नासाठी तिनं सुंदर असा लेहंगा परिधान केला होता. तसेच फोटोमध्ये नववधू आलियाचं सौदर्य (Beautiful Bride Alia Bhatt) अगदीच खुलून आलं. आलिया सोबतच रणबीरचा (Ranbir Kapoor) लूकही अगदी राजबिंडा होता. फोटोमध्ये तो देखील प्रचंड रुबाबदार दिसत आहे.

 

 

अनेक प्रेक्षकांना त्या दोघांचे लग्नातील लूक पाहण्याची उत्सुकता होती. अखेर प्रेक्षकांची प्रतिक्षा संपली असून, त्या दोघांच्या लग्नातील फोटो (Alia Bhatt – Ranbir Kapoor Wedding) सोशल मीडियावर आले आहेत. तसेच लग्न झाल्यानंतर लगेचच कपूर कुटूंबाच्या घराबाहेर असणाऱ्या पापाराझींचही तोंड गोड करण्यात आलं.

 

 

दरम्यान, आलिया आणि रणबीरच्या लग्नाला करण जोहर (Karan Johar),
आयान मुखर्जी (Ayan Mukherji), करीना कपूर (Kareena Kapoor),
करिश्मा कपूर (Karishma Kapoor) यांनी आपली मोलाची हजेरी लावली.
तसेच हे लग्न पंजाबी पद्धतीनं पार पाडण्यात आलं.

 

Web Title :- alia ranbir first wedding look revaledsee photo

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा