Alia Bhatt-Ranbir Kapoor | आलिया-रणबीरच्या लेकीसाठी पाकिस्तानी अभिनेत्याने लिहिली ‘हि’ खास पोस्ट .

पोलीसनामा ऑनलाईन : Alia Bhatt-Ranbir Kapoor | आलिया भट्टने मुलीला जन्म दिल्यानंतर कपूर परिवारात आनंदाचे वातावरण दिसत आहे. तर बॉलीवूड हॉलीवुड पासून सर्वांनी आलिया आणि रणबीरला (Alia Bhatt-Ranbir Kapoor) भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. अशातच आता पाकिस्तान अभिनेता (Pakistani Actors) आणि होस्ट यासिर हुसैननं (Yasir Hussain) याने आलियाच्या लेकीसाठी एक पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखी वायरल होत आहे.

यासिरची पोस्ट विचित्र असल्याने नेटकऱ्यांनी यावर भाष्य केले आहे. यासीर आपल्या पोस्टमध्ये आलियाच्या मुलीला शुभेच्छा देण्याऐवजी त्याने पाकिस्तान आणि भारतावर भाष्य केले आहे. यासिर आपल्या पोस्टमध्ये म्हणाला, “म्हणूनच आज कबीर खूप आनंदी आहे. दोन देशांच्या मैत्रीसाठी मी तयार आहे”. आता त्याच्या या पोस्टवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत तर काही नेटकऱ्यांना त्याच्या पोस्टवर संताप देखील आला आहे.  सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेता तसेच अनेक टीव्ही शोचा होस्ट म्हणून ओळखला जातो.

यासिर पाकिस्तानची प्रसिद्ध अभिनेत्री इकरा अजीजचा (Iqra Aziz) चा नवरा आहे.
सध्या त्याच्या या पोस्टने सोशल मीडियावर एकच धुमाकूळ घातला आहे.

Web Title :-  Alia Bhatt-Ranbir Kapoor | pakistani actors post for alia ranbirs daughter

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aditya Thackeray | नोटीस देण्याआधी खोके म्हणजे नक्की काय? सांगावं, आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारला सवाल

Pune Crime | बढाई समाज ट्रस्टच्या अध्यक्षाच्या खूनाचा प्रयत्न; रविवार पेठेतील घटना