Alia Bhatt – Ranbir Kapoor Wedding | आलिया आणि रणबीरच्या लग्नाची चर्चा अन् ऋषी-नीतू कपूर यांची लग्न पत्रिका व्हायरल…

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Alia Bhatt – Ranbir Kapoor Wedding | सोशल मीडियावर रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्टच्या लग्नाची (Alia Bhatt) जोरदार चर्चा चालू आहे. गेल्या अनेक वर्षापासून चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते. मात्र चाहत्यांची प्रतिक्षा संपली असून, ते दोघं एप्रिल महिन्यांतील 13 ते 18 एप्रिलमध्ये लग्नगाठ बांधताना दिसत आहे.

 

रणबीर आणि आलियाच्या लग्नाची तारीख जवळ अली असून, दोन्ही घरांमध्ये जोरदार तयारी सुरू आहे.
मात्र त्यांच्या लग्नाच्या गडबडीत सोशल मीडियावर रणबीरची आई नीतू सिंग आणि दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्या लग्नाची पत्रिका चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे.
त्यामुळं चाहत्यांनी अंदाज बांधला आहे की, रणबीर आणि आलियाची लग्न पत्रिका देखील अशीच असेल.
कारण आई – वडिलांप्रमाणेच त्यांच लग्नसुद्धा आर के हाऊसमध्येच (R.K. Films And Studio) धुमधडाक्यात करण्यात येणार आहे.

नीतू सिंग (Neetu Singh) आणि ऋषी कपूर (Rushi Kapoor) यांच लग्न 1980 मध्ये आर के हाऊसमध्ये झालं.
तसेच त्यानंतर 23 जानेवारी 1980 ला त्यांनी आपल्या लग्नाचं रिसेप्शन ठेवलं होत.
त्यांच्या लग्नाला परिवारातील सगळे सदस्य उपस्थित होते. तसेच त्या दोघांच्या रिसेप्शनची आमंत्रण पत्रिका
(Neetu – Rushi Wedding Card) सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
त्यावर लिहिल की, ‘मिस्टर आणि मिसेस राज कपूर यांचा मुलगा ऋषी कपूर आणि नीतू सिंहच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो.’

 

दरम्यान, लग्न अवघ्या काही दिवसांवर आलं असून सुद्धा अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूरनं आपल्या लग्नाबद्दल मौन बाळगलं आहे.

 

Web Title :-  Alia Bhatt – Ranbir Kapoor Wedding | alia bhatt and ranbir kapoor wedding rishi kapoor and neetu kapoor wedding invitation card viral

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा