कंगनाच्या टीकेला आलिया भटने दिले ‘हे’ प्रत्युत्तर

मुंबई : वृत्तसंस्था – आलीया भट्ट आणि कंगना राणौत या दोन बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींनमधले कोल्डवॉर काही संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. मणिकर्णिका चित्रपटापासून सुरु झालेला वाद अद्यापही चालूच आहे. एकीकडे कंगना आलियाला डिवचण्याचा एकही संधी सोडत नाही तर दुसरीकडे आलिया कंगनाला शांतपणे प्रत्युत्तर देताना दिसत आहे.

एका संकेतस्थळाने घेतलेल्या ऑनलाईन पोलमध्ये २०१९ च्या सर्वोत्कृष्ट नायिकेच्या स्पर्धेत कंगनाने आलियावर मात केली. लोकांनी दिलेल्या मतांच्या आधारावर कंगना अव्वल नंबरवर राहिली तर आलिया दुस-या क्रमांकावर आली. आलिया सोबत झालेली तुलना कंगनाला अजिबात आवडली नाही. ‘आलियासोबत माझी तुलना होणे ही माझ्यासाठी लाजीरवाणी बाब आहे. ‘गली बॉय’च्या तिच्या अभिनयात मला हरवण्यासारखे असे काय होते ? पुन्हा एकदा तशीच फटकळ मुलीची भूमिका. मीडियाकडून या स्टार किड्सना नेहमीच खूप प्रेम मिळत आलेलं आहे. कृपया आता तरी त्यांच्या बाजूनं बोलणं आणि त्यांचे लाड करणं सोडून द्या. अन्यथा चांगलं अभिनय कौशल्य कधीच बाहेर येणार नाही. असे कंगना या पोलवर प्रतिक्रिया देताना म्हणाली होती.

कंगनाच्या या वक्तव्याबाबत आलीयानेही प्रत्युत्तर दिले आहे. आलिया म्हणाली की, ‘मला कंगनाचा अभिनय खूप आवडतो. तिच्या मताचा मी आदर करते. तिचे अशाप्रकारचे मत असेल तर नक्कीच त्या मागे काही कारण असेल. मला केवळ माझ्या कामावर लक्ष द्यायचे आहे आणि कंगनाने राझी या चित्रपटातील माझ्या भूमिकेची प्रशंसा केली होती. मी अधिक मेहनत घेऊन चांगले काम केले तर नक्कीच पुन्हा ती माझे कौतुक करेल.’

कंगना तिच्या निर्भिड वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असते. कंगनाकडे ‘मेंटल है क्या’ आणि ‘जयललिता’ हे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत . तर आलियाचा कलंक येता १७ एप्रिलला रिलीज होत आहे.

You might also like