अभिनेत्री आलिया भट्ट ‘हे’ चॅनेल चालू करणार

मुंबई : वृत्तसंस्था – आलिया भट्ट बॉलीवूडच्या यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. आलिया सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. आलिया आपले ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसोबत शेअर करत असते. रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, आलिया आपले यूट्यूब चॅनेल लॉन्च करते आहे.

आपल्या यूट्यूब चॅनेलच्याद्वारे आलिया चाहत्यांसोबत शेड्यूल, फॅशन, मेकअप आणि फिटनेस टिप्स शेअर करणार आहे. आलिया आपल्या चाहत्यांना खाजगी जीवनात गुंतवू इच्छिते आहे. सूत्रांनी सांगितल्यानुसार, ‘आलियाला नवीन गोष्टी वापरण्यास खूप आवडतात.

त्यामुळे इंस्टाग्राम आणि ट्विटर नंतर ती आता यूट्यूबवर अ‍ॅक्टिव्ह राहण्याचे इच्छिते आहे. आलियाचे म्हणणे आहे की, व्हिडीओद्वारे चाहत्यांपर्यंत आपले बोलणे जावे हा एक चांगला पर्याय आहे. आलियाच्या यूट्यूब चॅनेल वर तिच्या जीवनातल्या प्रत्येक पैलू बद्दल अपल्याला सांगणार आहे. रिपोर्ट्सच्या माहिती नुसार आलिया भट्ट २६ जूनला आपले यूट्यूब चॅनेल लॉन्च करू शकते.

सूत्रांनी सांगितले की, ‘इंस्टाग्रामवर आपण चाहत्यांसोबत फक्त फोटोद्वारे कनेक्ट राहू शकतो. यूट्यूब चॅनेलवर आलिया आपल्या फिटनेसबद्दल सांगणार आहे. चित्रपटामधील तिच्या वेगवेळ्या लूक्स बद्दल देखील ती सांगणार आहे. तिच्या कामाबद्दल बोलायचे गेले तर, आलियाचे करियर सध्या यशस्वी मार्गावर आहे. आलियाने अनेक हिट चित्रपट केले आहेत.

ऑडियंस कडून आलिया ला भरपूर सपोर्ट मिळाला आहे. आलिया या दिवसांमध्ये तिचा आगामी चित्रपट ब्रह्मास्त्रच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे. या चित्रपटामध्ये आलियासोबत रणबीर कपूर दिसून येईल.

आरोग्यविषयक वृत्त – 

धक्कादायक ! भारतीयांचं वयोमान वायू प्रदूषणामुळे तब्बल ‘एवढ्या’ वर्षांनी झाले कमी

‘या’ कारणामुळे सकाळी उठल्यावर मोबाईलचा वापर शक्यतो टाळाच

यामुळे कारणांमुळें वाढत महिलांचं वजन

फिट राहण्यासाठी दीपिकाचा नवीन फंडा