Video : ‘या’ अभिनेत्रीने तोडली परिवाराची ‘परंपरा’, सगळ्यांच्या विरोधात घेतला ‘हा’ निर्णय !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ‘टाइम टू रिटैलिएट : मासूम’ हा चित्रपटाची कहानी बाल लैंगिक शोषणाच्या विरोधात असलेल्या एका महिलेची आहे. हा चित्रपट ५ जुलैला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कश्मिरची अभिनेत्री आलिया खान मुख्य भूमिका साकारणार आहे. कुमार आदर्श यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. आलियासोबत अभिनेता रितेश रघुवंशी आणि वृद्धी पटवा हे सुद्धा चित्रपटात झळकणार आहे. चित्रपटाचा ट्रेलरसुद्धा प्रदर्शित झाला आहे.

चित्रपटामध्ये आलिया खान जोयाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाबद्दल ती म्हणते की, या चित्रपटात माझी भूमिका खूप स्ट्रॉंग आहे. लहान मुलींवर होणाऱ्या घृणास्पद गोष्टी समाजासमोर आणण्याची गरज आहे. या चित्रपटामध्ये इस्लाममध्ये चुकीच्या गोष्टींना दूर करण्यासाठी शिकवण दिली जाते पण जेव्हा मदरसेमध्ये अशी चुकीची गोष्ट घडते तेव्हा त्याचा विरोध झाला पाहिजे. लहान मुलांसोबत होणाऱ्या अशा वाईट गोष्टींना समाजापुढे आणण्याचे काम चित्रपटामधून जोया करणार आहे.

आलिया आपल्या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे. आलियाने याआधी दोन साउथ चित्रपटात काम केले आहे. आलियाला मुंबईमध्ये येऊन २ वर्ष झाली आहेत. आलिया ही कश्मिरची प्रतिष्ठित डार परिवारातील आहे. जिथे मुलींना बाहेर पडणेही मुश्किल आहे. त्यांच्या परिवारातील मुली बाहेर काम ही करत नाही. आलियाने या परंपरेला तोडून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. यासाठी तिला सगळ्यात जास्त सपोर्ट तिचे वडिल अब्दुल अजीज डार आणि आई परवीन यांनी केला. यांचे विचार मॉर्डन आहे. आलियाच्या या निर्णयाला परिवाराकडून खूप विरोध होता पण स्वप्न पुर्ण करण्यासाठी ती मुंबईला आली. हा तिचा पहिला चित्रपट आहे.

रायगडमध्ये हायप्रोफाईल ‘रेव्ह पार्टी’चा पर्दाफाश, ‘नको त्या अवस्थेत’ बॉलिवूड अभिनेत्री, TV कलाकार

Video : अभिनेत्री करिना कपूरच्या ‘या’ बोल्ड व्हिडीओने वाढवलं इंटरनेटच ‘तापमान’

चिंचेचा ‘हा’ फेसपॅक वापरा आणि चेहऱ्याचे सौंदर्य खुलवा

रोज एक कप ‘कॉफी’ प्या आणि ‘मधुमेह’ कंट्रोलमध्ये आणा

मराठा समाज सर्वोच्च लढाईसाठी तयार, विनोद पाटील यांनी दाखल केले ‘कॅव्हेट’