UC Drive भारतात लॉन्च, मिळणार 20 GB फ्री स्टोरेज, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अलीबाबा कंपनीचे UC Browser भारतात UC Drive घेऊन येत आहे. ही क्लाउड बेस सेवा आहे. भारतात ही सेवा पहिल्यांदाच लॉन्च करण्यात आली. क्लाऊड बेस्ड ड्राइव्हवर यूजर्स फोटो, व्हिडिओ आणि फाइल स्टोअर करु शकतात. UC Browser भारतातील प्रसिद्ध ब्राऊजर आहे. आता यात UC Drive चे फिचर जोडले जाईल.

कंपनीच्या मते UC Browser साठी भारत मोठे मार्केट आहे त्यामुळे UC Drive भारतात लॉन्च करण्यात आले आहे. यात तुम्हाला 20 जीबी डाटा स्टोरेज मिळेल. म्हणजेच USB Drive किंवा हार्ड डिस्क शिवाय तुम्ही डाटा स्टोअर करु शकतात. जे तुम्ही जगातून कधीही कुठेही अ‍ॅक्सेस करु शकालं. यात तुम्हाला अनलिमिटेड डाऊनलोडिंगचा पर्याय देण्यात आला आहे. कंपनीचा दावा आहे की UC Drive साठी जास्त इंटरनेट डाटा लागणार नाही. तुम्ही डाटा वाचवून फाइल किंवा इतर फॉरमेट डाऊनलोड करु शकतात.

UC Drive चे खास फीचर्स –
UC Drive असल्यास तुम्ही तुमच्या फाइल्स सहज डाऊनलोड करु शकालं. यासाठी ‘Save to drive’ पर्याय देण्यात आलेला आहे. याद्वारे तुम्ही क्लाऊडद्वारे सहज आपला डाटा डाऊनलोड करु शकतात.
UC Browser वापर तुम्ही मोबाइलच्या मेमरीचा वापर न करता डाऊनलोड करु शकतात किंवा सेव्ह करु शकतात.
UC Drive द्वारे तुम्ही फाइल शेअर करु शकतात. एकमेकांसह फाइल शेअर करण्याचा स्पीड देखील यात जास्त आहे. असे असले तरी एखाद्या फाइल ट्रान्सफर अ‍ॅप सारखे हे काम करणार नाही, तर हे क्लाऊड स्टोरेज आहे, जेथून तुम्ही दुसऱ्या यूजर्सला फाइल ट्रान्सफर करु शकतात.
UC Drive वर तुम्ही फ्रीमध्ये अकाऊंट ओपन करु शकतात. यूजर्सला यात 20 जीबी फ्री ड्राइव्ह मिळेल. इतर कंपन्या म्हणजेच Google, One Drive आणि Dropbox हे ग्राहकांना 15 जीबीचे फ्री स्टोरेज देतात.

UC Drive वर मिळणाऱ्या ऑफर्स –
कंपनीने भारतात UC Drive लॉन्च केले आहे. त्यामुळे यूजर्स जबरदस्त ऑफर देण्यात आल्या आहेत. यात यूजर्सला 20 ग्रॅम सोनं आणि स्मार्टफोन जिंकण्याची संधी आहे. एवढेच नाही तर अ‍ॅमेझॉन आणि ओयोचे 50 मिलियन वॅल्यूचे कूपन्स देखील यूजर्स जिंकू शकतात. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी कंपनीने 13 जानेवारी ते 19 जानेवारीपर्यंतचा कालावधी दिला आहे.

फेसबुक पेज लाईक करा –