भारताच्या स्मृति मंधानाची ‘कमाल’, एलीस पेरी बनली 2019 ची ICC ची ‘सर्वश्रेष्ठ’ महिला ‘क्रिकेटर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताची सलामी फलंदाज स्मृति मंधानाला मंगळवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद 2019 साठीच्या एकदिवसीय आणि टी – 20 मध्ये सहभागी करण्यात आले आहे. एकदिवसीय क्रिकेटमघ्ये मंधानाबरोबरच झूलन गोस्वामी, पूनम यादव आणि शिखा पांडे यांना जागा मिळाली आहे. तर टी – 20 संघात अष्टपैलू दीप्ती शर्मा देखील सहभागी आहे.

23 वर्षी मंधानाने 51 एकदिवसीय आणि 66 टी – 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांशिवाय दोन कसोटी सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले. तिने एकदिवसीय आणि टी-20 सामन्यात 3476 धावा केल्या. या वर्षाची सुरुवात श्रीलंकेच्या विराधात विक्रमी 148 धावा खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या एलीसाला वर्षाचा सर्वश्रेष्ठ टी – 20 महिला क्रिकेटर म्हणून निवडण्यात आले.

ऑस्ट्रेलियाच्या एलीस पेरीला या वर्षांची सर्वश्रेष्ठ एकदिवसीय खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे. या अष्टपैलू खेळाडूच्या नावे 2019 मध्ये 73.50 च्या सरासरीने 441 धावा केल्या याशिवाय 13.52 टक्क्यांच्या सरासरीने 21 विकेट घेतल्या.

पेरीला यावर्षी रशेल हेहोई- फ्लिंट पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे. या वर्षीच्या प्रगती पथावर असलेल्या क्रिकेटचा पुरस्कार थायलंडच्या चानिडा सुथिरयुंग ला देण्यात येईल. 26 वर्षीय या वेगवान गोलंदाजाने आयसीसी महिला टी – 20 मध्ये कप क्वालीफायरमध्ये 12 विकेट घेतले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/