हृतिक रोशनच्या ‘Krrish 4’ मध्ये होऊ शकते ‘जादू’ची वापसी ! खुद्द अभिनेत्यानंच दिला ‘इशारा’

पोलीसनामा ऑनलाईन टीम : गेल्या अनेक दिवसांपासून अशी माहिती आहे की, बॉलिवूड स्टार हृतिक रोशनची सर्वात हिट फ्रेंचायजी क्रिश च्या चौथ्यावर पार्टवर म्हणजेच क्रिश 4 च्या स्क्रिप्टवर काम सुरू आहे. अशात एक मोठी माहिती समोर आली आहे. असं समजत आहे की, क्रिश 4 मध्ये या फ्रेंचायजीचा पहिला सिनेमा कोई मिल गया मधील जादूची एन्ट्री होणार आहे.

एका इंग्रजी वृत्तानुसार, राकेश रोशन क्रिश 4 मध्ये एलियन जादूला वापस आणण्याची तयारी करत आहेत. टीमसोबत मिळून याच्या स्क्रिप्टवरही काम सुरू आहे आणि जादूच्या वापसीसाठी प्रयत्न करत आहेत. जर असं झालं तर सिनेमात 17 वर्षांनंतर जादूची एन्ट्री होणार आहे. इतकंच नाही तर एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना खुद्द हृतिक रोशननंही या गोष्टीचा इशारा दिला आहे की, क्रिश फ्रेंचायजीच्या आगामी सिनेमात जादूची वापसी होण्याची शक्यता आहे.

क्रिश हा सिनेमा 2006 साली आणि क्रिश 3 हा सिनेमा 2013 साली आला होता. ही गोष्ट कोणालाच माहिती नसेल परंतु 2003 मध्ये आलेल्या कोई मिल गया या सिनेमात इंद्रवर्धन पुरोहितनं जादूची भूमिका साकारली होती. 2014 मध्ये या अ‍ॅक्टरचं निधन झालं आहे. हृतिकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो शेवटचा वॉर या सिनेमात दिसला होता. या सिनेमात त्याच्यासोबत अभिनेता टायगर श्रॉफ प्रमुख भूमिकेत होता.