चंद्रावर दिसल्या ‘अज्ञात’ उडणार्‍या गोष्टी, वैज्ञानिक ‘हैराण-परेशान’ होवुन म्हणाले – ‘हे आहे तरी काय ?’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चंद्रावर मानव पोहोचण्याची चर्चा जुनी झाली आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजही चंद्रावर एलियन आहेत का? जगभरातील शास्त्रज्ञांमध्ये या विषयाबद्दल बरेच सिद्धांत आहेत. पण ट्विटरवर एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर असे दिसते की चंद्रावर एलियनचे घर आहे…

हा व्हिडिओ ट्विटरवर फिजिक्स-अ‍ॅस्ट्रोनॉमी @Physicastrono9 नावाच्या ट्विटर हँडलरने पोस्ट केला आहे. यात सांगण्यात आले आहे की चंद्राचा हा 59 सेकंदांचा व्हिडिओ क्यूबेक शहरातील एका सायन्स फोटोग्राफरने बनविला आहे. आतापर्यंत 4500 हून अधिक लोकांनी या व्हिडीओस पाहिले आहे. यामध्ये दिसत आहे की चंद्राच्या ईशान्येकडील भागात प्रकाशातून दोन अज्ञात वस्तू बाहेर येत आहेत.

जेव्हा ते प्रकाशातून बाहेर पडून अंधारकडे येतात तेव्हा त्यातील एकाची सावली पृष्ठभागावर पडताना दिसून येते. परंतु, दुसऱ्याची नाही. यानंतर चंद्राच्या पृष्ठभागाच्या प्रकाशमय भागात दोन्ही उडणाऱ्या वस्तूंची सावली दिसू लागते. मग जेव्हा या दोन अज्ञात वस्तू अंधाराच्या दिशेने येतात तेव्हा त्या चमकदार पांढऱ्या रंगाच्या दिसतात.

इतकेच नाही तर अशाच आणखी तीन उड्डाण करणार्‍या वस्तू त्यांच्या मागून येताना दिसतात. पण फक्त दोनच वस्तू दिसतात. परंतु जसे ही या अज्ञात वस्तू अंधाराकडे येतात, तेव्हा समजते की या तीन आहेत. त्यानंतर हे तिघेही अंधारात गायब होतात.