आश्चर्य ! आईस्क्रीम न मिळाल्याने मुलीने मोडले लग्न

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तरप्रदेश मधील अलिगढमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. अनेकदा हुंडा मागितल्याने किंवा मागण्या पूर्ण न झाल्याने नवऱ्या मुलीने लग्न मोडल्याची अनेक उदाहरणे आपण पहिली आहेत. मात्र या ठिकाणी लग्न मोडण्याचे कारण ऐकून तुम्हाला हसू आवरणार नाही. लग्नात आपल्या दाजीला आईस्क्रीम न मिल्याने या मुलीने लग्न मोडले. सासनी गेट येथील वार्ष्णेय मॅरेज होम मध्ये या मुलीचे लग्न होते. मात्र आपल्या दाजीला आईस्क्रीम न मिळाल्याने या मुलीने लग्नाला नकार दिल्याने लग्नमंडपात मोठा गोंधळ उडाला.

लग्न लागल्यानंतर वऱ्हाडी मंडळींसह जेवण करत असताना मुलीच्या दाजीचा आईस्क्रीम वरून नवऱ्या मुलाच्या नातेवाईंकांबरोबर भांडण झाले. या भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर संतापलेल्या मुलीने अखेर लग्नाला नकार देत हे लग्न मोडल्याचे सांगितले. मात्र यानंतर संतापलेली मुलगी नवऱ्या मुलाने समजूत घालून देखील त्याचे न ऐकता आपल्या निर्णयावर ठाम होती. त्यानंतर तिने थेट पोलीस स्टेशन गाठून यासंबंधी तक्रार दाखल केली. त्यानंतर पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये दोन्ही पक्षांच्या माणसांमध्ये हाणामारी झाली. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत हि भांडणे थांबवली.

दरम्यान, पोलिसांनी देखील मुलीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र मुलगी आपल्या निर्णयावर ठाम होती. वधूपक्षाने वरपक्षावर मारहाणीचा आणि दोन लाख रुपये हुंडा मागितल्याचा आरोप केला आहे. मुलाकडील नातेवाईंकावर कारवाईची मागणी केली असून या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सिने जगत –

‘माता-पिता की चरणों में स्वर्ग’ म्हणणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचा ‘वाढीव’ लुक पाहिलात का ?

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

अभिनेत्री उशोशी सेनगुप्‍ता म्हणाली, गप्प बसली असते तर झाली नसती ‘छेडछाड’ ; ७ गुंडाना अटक

अभिनेत्रीने तिच्या हाताने उचलला तिचा लेहंगा, पुढे झाले असे काही

..म्हणून ‘बिग बॉस’ बॅन करण्यासाठी वकिलाची तक्रार दाखल

अभिनेता आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिराने ‘तेथे’ फोटो काढला, त्यानंतर मात्र,.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like