बलात्कार प्रकरणातील आरोपींना पेट्रोल टाकून जाळा ; विश्‍व हिंदू परिषदेच्या ‘या’ नेत्याचे वक्‍तव्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील अलिगढमध्ये लहान मुलीच्या झालेल्या खूनप्रकरणात आता विविध स्तरातून प्रातिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. फक्त ५ हजारांसाठी ओळखीच्या दोन जणांनी एका अडीच वर्षांच्या मुलीची हत्या करून तिचा मृतदेह कचऱ्याच्या पेटीत टाकून दिला.

मुलीच्या वडिलाने कर्ज म्हणून घेतलेले पैसे परत न केल्याने नराधमांनी हे कृत्य केलं होतं. बॉलिवूडमधून देखील काल मोठ्या प्रमाणात या प्रकरणाचा निषेध करण्यात आला. त्यानंतर आता विश्व हिंदू परिषदेच्या साध्वी प्राची यांनी यासंदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. या प्रकरणातील आरोपींना कडक शिक्षा देण्यात यावी.

त्याचप्रमाणे आरोपींना पेट्रोल टाकून जिवंत जाळण्यात यावे, असेदेखील त्या पुढे म्हणाल्या.
पुढे अधिक बोलताना त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आवाहन करत म्हटले कि, गुंडाचा नाही तर बलात्काऱ्यांचा एन्काउंटर करायला हवा, त्याआधी मृत्युमुखी पडलेल्या चिमुकलीच्या आईने योगी आदित्यनाथ यांना विनंती केली होती कि, आरोपींना कडक शिक्षा देण्यात यावी. जर त्यांना सात वर्ष किंवा कमी शिक्षा मिळाली तर ते जेलमधून बाहेर येत पुन्हा गुन्हे करतील.

आपल्याच मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप

आरोपीने स्वतःच्या चार वर्षाच्या मुलीचा देखील बलात्कार केला असल्याचा आरोप मृत मुलीच्या आईने केला आहे. त्यामुळे त्याची पत्नी देखील घर सोडून गेली असल्याचे तिने म्हटले आहे. तसेच याप्रकरणी आतपर्यंत पाच पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

Loading...
You might also like