आलिया भट्टचा रणबीर कपूरबाबत मोठा खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर चर्चेत असल्याचं दिसत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते एकमेकांना डेट करताना दिसत आहे. अयान मुखर्जीने दिग्दर्शित केलेल्या ब्रह्मास्त्र या सिनेमात दोघेही एकत्र दिसणार आहेत. बॉलिवूडमधील वृत्तांनुसार, आलिया भट्ट रणबीर कपूरच्या कामाची मोठी फॅन आहे. नुकताच आलियाने असा खुलासा केला आहे की, अयान मुखर्जीला तिने विनंती केली होती की, त्यांनी या दोघांना ब्रह्मास्त्र मध्ये कास्ट करावं.”

आलियाने अयान यांना यासाठी अशी विनंती केली होती कारण ती रणबीर सोबत काम करण्यासाठी फारच एक्साईटेड झाली होती. एका मीडिया पब्लिकेशनसोबत बोलताना आलियाने याबाबत खुलासा केला आहे. यावेळी बोलताना आलिया म्हणाली की, “जेव्हा अयानने ये जवानी है दीवानी हा सिनेमा केला होता तेव्हापासूनच तो ब्रह्मास्त्रबाबत विचार करत होता. मला अयान सोबत काम करायचं होतं. सोबतच मला नेहमीच रणबीर कपूर सोबत काम करण्याची इच्छा होती. मी रणबीर कपूरची खूप मोठी फॅन आहे.

तु्म्हाला आणखी सांगू इच्छितो की, ब्रह्मास्त्र या सिनेमात मौनी रॉय आणि अमिताभ बच्चन हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. करण जोहर या सिनेमाची निर्मिती करणार आहे. यावर्षी हा सिनेमा ख्रिसमसला रिलीज होणार आहे.

You might also like