Alka Kubal And Priya Berde | पुण्यातील ‘त्या’ कार्यक्रमात अनावश्यक आणि बोगस खर्च, अलका कुबल आणि प्रिया बेर्डेंसह 15 जणांना न्यायालयाचा दणका, 10 लाखांचा दंड !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Alka Kubal And Priya Berde | चित्रपट महामंडळाने पुण्यात मानाचा मुजरा (Manacha Mujra) हा सांस्कृतिक कार्यक्रम घेतला होता. या कार्यक्रमासाठी केलेल्या अनावश्यक आणि बोगस खर्चाचे 11 लाख रुपये सहा आठवड्यात न्यायायलयात भरावेत, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या आजी व माजी पदाधिकारी, संचालकांना दिला आहे. अलका कुबल आणि प्रिया बेर्डे यांच्यासह एकुण 15 जणांना हा दंड भरण्याचा आदेश देण्यात आला आहे. (Alka Kubal And Priya Berde)

 

2012-13 दरम्यान मानाचा मुजरा हा कार्यक्रम पुण्यात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमासाठी तत्कालीन संचालकांनी 52 लाख रुपये खर्च केले होते. सर्वसाधारण सभेत या खर्चाला मान्यता मागितली होती. त्यावेळी सभासदांनी आक्षेप घेत जे खर्च चुकीच्या पद्धतीने झाले आहेत, त्याची वसुली झाली पाहिजे, अशी मागणी केली होती.

 

तत्कालिन संचालकांनी बोगस खर्च दाखवून रक्कम लाटल्याचा आरोप सभासदांनी केला होता.
त्यानुसार धर्मादाय आयुक्तांनी 10 लाख 78 हजार रुपये तातडीने भरण्याचा आदेश दिला.
पण संबंधित संचालकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. परंतु, त्यांची याचिका फेटाळून लावत ती रक्कम सहा आठवड्यात भरण्याचा आदेश देण्यात आला आहे.
ही रक्कम भरण्यास टाळाटाळ केल्यामुळे महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी अनेक संचालकांचे सभासदत्व रद्द केले आहे.

महामंडळाचे माजी अध्यक्ष प्रसाद सुर्वे, विजय कोंडके, विजय पाटकर, मिलींद अष्टेकर, सतीश बिडकर,
सुभाष भुरके, अलका कुबल, प्रिया बेर्डे, अनिल निकम, संजीव नाईक, सतीश रणदिवे, इम्तियाज बारगीर,
सदानंद सूर्यवंशी, बाळकृष्ण बारामती व व्यवस्थापक रवींद्र बोरगांवकर यांच्याकडून ही रक्कम भरून घ्यावी असे आदेश दिले आहेत.

 

Web Title :- Alka Kubal And Priya Berde | actress alka kubal and priya berde hit by court fine of 10 lakhs to be paid know what is the case pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Breast Pain Before Period | मासिक पाळीपूर्वी स्तन दुखण्याचा त्रास होत असेल तर असू शकते ‘हे’ कारण, जाणून घ्या उपचार

Shambhuraj Desai | ‘आम्हाला गद्दार म्हणताना एकच विचार करावा की…’ शंभूराज देसाईंचा ‘गद्दार’ शब्दावरुन अजित पवारांना इशारा

Pune Police | पुण्यात मुलं पळवणारी टोळी सक्रीय ही अफवा, खोटी माहिती पसरवणाऱ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई