अलका लांबांचा ‘आम आदमी’ला ‘रामराम’ ! कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आम आदमी पार्टीच्या आमदार अलका लांबा यांनी राजीनामा दिला आहे. दिल्लीतील चांदनी चौकच्या आमदार असणाऱ्या लांबा यांनी ट्वीट करून पार्टी सोडल्याची घोषणा केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्या पार्टी सोडणार, अशी चर्चा होती. अलीकडेच त्यांनी कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. त्यामुळे त्या कॉंग्रेसमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

लांबा यांनी ट्विटरवर म्हंटले आहे की, ‘आम आदमी पार्टीला अलविदा म्हणण्याची आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा देण्याची वेळ आली आहे. गेल्या सहा वर्षांचा प्रवास खूप चांगला झाला ,खूप शिकायला मिळाले. सर्वांना धन्यवाद.’

2020 च्या दिल्ली विधानसभा निवडणुक अपक्ष म्हणून लढविणार असल्याचे अलका लांबा यांनी काही दिवसापूर्वीच जाहीर केले आहे. आम आदमी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांवर त्या नाराज असल्याची चर्चा आहे. अल्का लांबा यांनी मंगळवारी कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया यांची भेट घेतली होती.

आपमध्ये सामील होण्यापूर्वी 20 वर्ष कॉंग्रेसमध्ये –
आम आदमी पार्टीमध्ये जाण्यापूर्वी अलका लांबा 20 वर्षे कॉंग्रेसमध्ये होत्या. यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्याकडे जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली होती. यानंतर पक्षाच्या आमदारांनी त्यांना व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून काढून टाकले होते . याशिवाय त्यांनी पक्षासाठी प्रचार करण्यास नकार दिला होता.

आरोग्यविषयक वृत्त –