‘त्या’ १३ जवांनाचे पार्थिव नेण्यासाठी ‘विशेष’ हेलिकॉप्टर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय हवाई दलाच्या AN-32 विमानाचे अवशेष शोधणाऱे पथक सकाळी अपघातस्थळी पोहोचले. या पथकाला या विमानातील १३ जणांचे मृतदेह सापडले असून त्यांचे मृतदेह विशेष हेलिकॉप्टरने नेण्यात येणार आहेत. तर विमानाचा ब्लॅक बॉक्सदेखील सापडला आहे.

बेपत्ता विमानाचे अवशेष अरुणाचल प्रदेशात साडले. या विमानात ८ क्रू मेंबर आणि ५ इतर असे १३ जण होते. यासंदर्भात भारतीय हवाई दलाने १३ जणांच्या कुटुंबियांना याची माहिती दिली आहे.

अरुणाचलकडे जाताना बेपत्ता झाले होते विमान
आसामच्या जोरहाट येथून उड्डाण केलेले हवाई दलाचे विमान अरूणाचलकडे ३ जून रोजी उड्डाण केले होते. त्यावेळी विमानात १३ जण होते. १२ वाजून २५ मिनीटांनी विमानाने अरुणाचलच्या दिशेने उड्डाण केले. मात्र एकच्या सुमारास विमानाचा संपर्क तुटला. यानंतर विमानाचा शोध सुरु करण्यात आला. विमानाचा शोध घेण्यासाठी हवाई दालाने सुखोई-३० आणि सी १३० या विमानांची मदत घेतली.

विमानाचे अवशेष सापडले
अखेर विमानाचे अवशेष अरुणाचलमध्ये सापडले. त्यानंतर विमानातही तेरा पैकी काही जण जिवंत असल्याची शक्यता असेल असे हवाई दलाच्या अधिकाऱ्यांना वाटले होते. मात्र बेपत्ता विमानाचा शोध घेत असताना विमानाचे पायुम नावाच्या गावाजवळ अवशेष दिसल्याचे सांगण्यात आले होते.

मात्र त्यानंतर आज विमानाच्या अवशेषांजवळ शोध पथक पोहोचले तेव्हा त्यातील १३ जणांचा मृत्यू झाल्याचे आज सकाळी समोर आले. त्यानंतर या सर्व १३ जणांच्या कुटुंबियांना यासंदर्भात कळविण्यात आले असल्याचे हवाई दलाच्या सुत्रांनी सांगितले.

आरोग्य विषयक वृत्त –

रोज सकाळी कोमट पाणी प्या, होतील ‘हे’ १० फायदे

हार्ट अटॅक अनेकदा सकाळीच का येतो? बचावाचे उपाय

‘हे’ चिमूटभर नैसर्गिक ‘माऊथ फ्रेशनर’ खा, होतील अनेक फायदे

पुरुषांनी ‘हा’ उपाय केल्यास शरीर राहील निरोगी

You might also like