खुशखबर ! सर्वच सर्व प्रकारचे ‘कर्ज’ होणार ‘स्वस्त’, व्याजदर ‘रेपो’रेटला जोडण्यास सर्व बँका तयार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. सरकारने बँकांना मोठी मदत देण्याची घोषणा केली आहे. RBI कडून व्याजदरात कपात करण्यात आल्याचा फायदा ग्राहकांना देण्यावर सर्व बँकांनी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे आता गृह कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज तसेच इतर कर्जावरील EMI कमी केले आहेत.

सरकारी बँक कर्ज पूर्ण करण्यासाठी 15 दिवसांच्या आत ग्राहकांना कागदपत्रे देण्यात येतील. आता सर्व प्रकारचे अर्ज ऑनलाइन असतील. लोन अप्लिकेशनची ऑनलाइन ट्रॅकिंग होईल. स्टार्ट अप आणि त्यातील गुंतवणूकदारांसाठी असलेला एंजेल टॅक्स प्रोविशनला रद्द करण्यात आले आहे. तसेच बँकांना 70 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जेणे करुन ते जास्तीत जास्त कर्ज देऊ शकतील.

अर्थमंत्री म्हणाल्या, RBI ने मागील काही काळात रेपो रेटमध्ये कपात केली आहे. परंतू याचा फायदा लोकांना झाला नाही. या संबंधित त्यांनी अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांबरोबर बँकांच्या प्रमुखांची बैठक झाली. या बैठकीत बँकांनी सामान्य लोकांना सर्व प्रकारचे कर्ज रेपो रेटला जोडण्यास सहमती दर्शवली. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, येणाऱ्या दिवसात सर्व बँका आपल्या व्याजदरांना रेपो रेटला जोडतील.

आरोग्यविषयक वृत्त –