स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठीचे सर्वच उमेदवार अपात्र

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – महानगर पालिका स्वीकृत नगरसेवक निवडीत सर्व 5 उमेदवारांना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी अपात्र ठरवले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून बाबा गाडळकर, विपुल शेटीया. शिवसेनेकडून संग्राम शेळके, आढाव मदन संपत तर
भाजपकडून रामदास आंधळे हे स्वीकृत नगरसेवक पदासाठी उमेदवार होते. स्वीकृत नगरसेवक पदासाठी असलेल्या नियमावलीत, निकषात हे उमेदवार बसत नसल्याचे सांगत जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना अपात्र ठरविले आहे.

राजकीय लॉबिंग करून त्यांनी स्वीकृत नगरसेवक पदासाठी स्वतःची वर्णी लावण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र नियमावर बोट ठेवून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे प्रयत्न हाणून पाडले. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/