केंद्र सरकारनं सशस्त्र पोलिस बलाचं सेवानिवृत्तीचं वय ठरवलं, आता 60 व्या वर्षी होणार ‘रिटायर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरकारने घेतलेल्या नवीन निर्णयामुळे आता कॉन्स्टेबल ते कमांडन्ट या उतरंडीच्या प्रत्येक पायरीवरील जवानाचे निवृत्ती वय आता सरसकट ६० वर्षे झाले आहे. केंद्रीय सशस्त्र पोलिस बलामध्ये कार्यरत असलेल्या जवानांसाठी सरकारने निवृत्ती वय ६० वर्षे निश्चित केले आहे. जवानांकडून या निर्णयाचे स्वागत होताना दिसत आहे.

सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा थेट फायदा केंद्रीय सशस्त्र पोलिस बलामध्ये समाविष्ट असलेल्या केंद्रीय राखीव पोलिस बल (CRPF), सीमा सुरक्षा बल (BSF), इंडो-तिबेट सीमा पोलिस बल व सहस्र सीमा बल या चार दलांना होणार आहे.

या चार दलांमधील उप महानिरीक्षक या पदापासून ते महासंचालक या पदापर्यंतच्या व्यक्ती साठाव्या वर्षी निवृत्त झाल्या आहेत. याशिवाय, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल व आसाम रायफल्स यातील जवान साठाव्या वर्षी निवृत्त होत आहेत.

या विरोधात काही अधिकाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यांच्या प्रयत्नांना यश येताना दिसत आहे. मोदी सरकार सतत सैन्य दलाच्या निर्णयाबाबत गांभीर्याने विचार करत आहे. त्यामुळे सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा सर्वच अधिकाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –