1 डिसेंबरपासून राज्यभरातील न्यायालये 2 शिफ्टमध्ये सुरू करा, पण पुणे…: उच्च न्यायालय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  तब्बल नऊ नहिन्यांच्या कालावधीनंतर, येत्या 1 डिसेंबरपासून पुणेव्यतिरिक्त राज्यभरातील सर्व जिल्हा आणि अन्य न्यायालये कोविड 19 सुरक्षा तत्त्वांचे पालन करून दोन शिफ्टमध्ये सुुरू करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी (दि. 27) दिले आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या प्रत्यक्ष कामाला आता रितसर प्रारंभ होणार आहे. मुख्य न्या. दिपांकर दत्ता यांच्यासह अन्य न्यायमूर्तींनी प्रशासकीय कामकाजावर निर्देश जारी केले आहेत.

न्यायालयात हजेरी लावताना तोंडावर मास्क लावणे बंधनकारक आहे. तसेच न्यायालयात सॅनिटायजर आणि अन्य निर्धारित साधने उपलब्ध असावीत, ज्यांची सुनावणी आहे, त्यांनाच प्रवेश द्यावा, एकमेकांपासून अंतर राखावे, बार रूम स्वच्छ ठेवावी आदी सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. न्यायालयातील कमर्चा-यांना पूर्ण क्षमतेने काम करण्याची सूचना आहे. न्यायाधीशांनी याबाबत दक्ष राहण्याचे आणि वकील संघटनांनी सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. यात कसूर करणा-यावर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे, तर पुण्यातील कोविडच्या परिस्थितीमुळे त्या ठिकाणी पूर्वीप्रमाणेच कामकाज सुरू राहील, असे स्पष्ट केले आहे. तसेच जिल्हावार परिस्थितीचा आढावा घेऊन यात उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, बदल होऊ शकतो, असेही सूचित करण्यात आले आहे.

You might also like