सर्व प्रकारची ‘डेबिट-क्रेडीट’ कार्ड करू शकणार ‘बंद-चालू’, ठरवू शकणार ‘मर्यादा’ : RBI

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – भारतातील सर्व प्रकारचे क्रेडिट – डेबिट कार्ड ग्राहक हवे तेव्हा चालू बंद करू शकतात. कार्डच्या बाबतीत होत असलेल्या फसवणुकीमुळे आरबीआयने अशा प्रकारची सुविधा सुरु करण्याचे आदेश सर्व बँकांना दिले आहेत.

या प्रकारचे ट्रांजेक्शन करू शकता चालू बंद
बँकांचे ग्राहक त्यांच्या निवडीनुसार डेबिट आणि क्रेडिट कार्डावर ऑनलाईन, फिजिकल, अशा प्रकारचे व्यवहार थांबवू शकतात आणि पुन्हा सुरु देखील करू शकतात. त्याचप्रमाणे बँक ग्राहक कार्डवर लिमिट मर्यादा देखील सेट करू शकतात. हा नियम पॉईंट ऑफ सेल मशीन आणि एटीएमवरही लागू होईल.

नव्या कार्डवर लागू होणार नियम
नवीन सुरु करण्यात येणारे कार्ड हे फक्त एटीएम आणि पॉईंट ऑफ सेल मशीनवर वापरता येणार आहेत. दुसऱ्या ट्रॅन्जेक्शनसाठी जसे की ऑनलाइन व्यवहारासाठी ग्राहकांना या कार्डला स्वतःच ऍक्टिव्ह करावे लागेल. हा नवीन नियम पूर्ण देशामध्ये 16 मार्च 2020 पासून लागू होईल.

बँकांना ही सुविधा ग्राहकांना मोबाइल अँप, इंटरनेट बँकिंग, एटीएम किंवा आईवीआरच्या माध्यमातून द्यावी लागेल. त्या व्यतिरिक्त ग्राहक आपल्या बँक शाखेत जाऊन देखील याबाबतची माहिती मिळवू शकतात. लागू केलेल्या ज्या कार्डचा सध्या ऑनलाइन,पीओएस किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या व्यवहारासाठी वापर करण्यात आलेला नाही त्या कार्डसाठी ही सुविधा दिली जाणार नाही. तसेच हा नियम प्रीपेड गिफ्ट कार्ड आणि बस,मेट्रोमध्ये वापरण्यात येणाऱ्या कार्डवर लागू होणार नाही.

 

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/