‘सर्वच घटनांनी मन विषष्ण’; पंकजा मुंडे वाढदिवस साजरा करणार नाहीत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

राज्यभर सुरु असलेल्या मराठा क्रांती मोर्चाने हिंसक वळण घेतले आहे. जागोजागी पोलीसांनी मराठा समाजावर लाठीचार्ज केला आहे तर अनेक ठिकाणी पोलिसांवरही दगडफेकीचे प्रकार झाले आहेत. मराठा समजाला आरक्षण मिळावे यासाठी काकासाहेब शिंदे या तरुणाने गोदावरी नदीत जलसमाधी घेतली. या सर्व प्रकारामुळे मन विषष्ण झाले असून यावर्षी वाढदिवस साजरा करणार नसल्याची घोषणा महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी केली. एका फेसबुक पोस्टद्वारे त्यांनी ही माहिती दिली आहे.
[amazon_link asins=’B014PHNO2Y’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bdb4c218-900b-11e8-b272-cb9c5e82a739′]

दरवर्षी वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा करते. यावर्षीही तसेच नियोजन करण्यात आले होते. पण गेल्या  काही दिवसातील घटनांनी मन विषष्ण झाले आहे. महाराष्ट्रातील माझा एक भाऊ ‘काका साहेब शिंदे’ याने स्वतःचा जीव गमावला आहे, एका आईच्या पोटचे लेकरू गेले ,तिच्या गळ्यातला ताईत गेला, त्या माऊलींच्या दुःखाची कल्पना ही कोणी करू शकत नाही, असे त्या म्हणल्या.

मी सगळं काही सुन्न होऊन बघत आहे आणि अगदी जाणून बुजून प्रतिक्रिया देण्याची घाई ही केली नाही. कारण भावना, पीडा बाजूला ठेवून केवळ राजकीय भांडवल करणं मला कधी जमतच नाही, असेही मुंडे म्हणाल्या.

‘एका उमेदीने, जग बदलण्याच्या जिद्दीने आम्ही तरुण राजकारणात आलो आहोत.. वंचित, पीडितांचे जीवन बदलण्यासाठी आम्ही राजकारण करत आहोत. त्यात यशस्वी होण्यासाठी तशी शिवरायांच्या विचारातील पोषक समाज व्यवस्था हवी. या विषयी आजकाल चिंता वाटते पण सर्व पार पडेल कारण हा छत्रपतींचा, शाहू महाराजांचा, महात्मा फुलेंचा, महामानव बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. तर ‘काकासाहेब शिंदे’ यांना श्रद्धांजलीही अर्पण केली.
[amazon_link asins=’B00KNOW2SQ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c2dea012-900b-11e8-957c-816d9952af44′]

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक तरूण जीवदान देण्याचा प्रयत्न करत आहेत. हे सर्व प्रकार थांबवा. ‘भावानो स्वतःचा जीव नका रे देऊ आपल्या आई वडिलांच्या चेहऱ्याला समोर ठेवा वाघानो, असे आवाहनही पंकजा मुंडे यांनी केले आहे.