तुमचे Aadhaar Card वैध आहे…जाणून घ्या येथे, UIDAI ने PVC आणि e-aadhaar बाबत काय म्हटले…?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आधार कार्ड आपल्या सर्वांसाठी एक आवश्यक डॉक्युमेंट आहे…आधारशिवाय आपल्या घरापासून बँकांपर्यंत अनेक कामे अडकतात. युआयडीएआयने ट्विट करून सांगितले की, सर्व प्रकारचे आधार वैध आहे, तुम्ही पीव्हीसी आधार कार्डचा वापर करा किंवा आधार लेटर किंवा ई-आधार. हे तीनही पूर्णपणे वैध आहेत. यूजर्स आपल्या सुविधेनुसार आधार कार्डचा वापर करू शकतात.

ई-आधार
ई-आधार तुम्ही तुमच्या मोबाइलमध्ये ठेवू शकता. यासाठी तुम्हाला आधारची हार्ड कॉपी बाळगण्याची गरज नाही. ई-आधार तुम्ही युआयडीएआयच्या वेबसाइटवरून डाऊनलोड करू शकता. सोबतच तुम्ही याची प्रिंट काढून कोणतीही योजना किंवा सरकारी ओळख पत्र म्हणून वापरू शकता.

आधार लेटर
आधार लेटर युआयडीएआयकडून पाठवले जाते. हे ते आधार कार्ड आहे जे अजूनपर्यंत पोस्टाने तुमच्या घरापर्यंत येत होते. पोस्टाच्या दिरंगाईमुळे ते वेळेत पोहचत नव्हते. यासाठी युआयडीए नागरिकांना आधार कार्डची सॉफ्ट कॉपी डाऊनलोड करण्याची सुविधा दिली आहे.

आधार पीव्हीसी कार्ड
युआयडीएआयने पीव्हीसी आधार जारी करण्यास सुरूवात केली आहे. पीव्हीसी आधार दिसायला एकदम एटीएम कार्डप्रमाणे असते. ते फाटण्याची भिती नसते. यामध्ये सुरक्षेसह ड्यूरेबिलिटीत सुद्धा चांगले आहे. हे आधुनिक सिक्युरिटी फीचर्ससोबत येते. याची प्रिंटिंग क्वालिटी चांगली आहे. पीव्हीसी आधार कार्डच्या सिक्युरिटी फीचर्समध्ये गिलोच पॅटर्न, होलोग्राम, घोस्ट इमेजसह माइक्रोटेक्स्ट आहे.

येथे मिळेल आधार कार्डसंबंधी समस्यांचे उत्तर
युआयडीएआयनुसार तुम्ही आधारशी संबंधी कोणत्याही समस्येसाठी 1947 वर कॉल करू शकता. येथे आधारशी संबंधी सर्व समस्यांचे उत्तर मिळेल.

याशिवाय कार्डधारक यूआयडीएआयच्या वेबसाइटच्या या https://resident.uidai.gov.in/lost-uideid लिंकवर व्हिजिट करून सुद्धा एनरॉलमेंट आयडी मिळवू शकतात.