…म्हणून सिंगर मिका सिंग ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशकडून ‘बॅन’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांच्या नातेवाईकांच्या मुलीच्या लग्नातील फंक्शनमध्ये सादरीकरण केल्यामुळे होणाऱ्या टीकेनंतर आता सिंगर मिका सिंगला ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन(AICWA)ने बॅन केलं आहे. याबाबतीत अधिकृत घोषणाही त्यांनी केली आहे.

त्यांनी केलेल्या स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे की, “ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन मिका सिंगने पाकिस्तान सेनेचे प्रमुख राहिलेले मुशर्रफ यांच्या नातेवाईकाच्या लग्नात 8 ऑगस्ट 2019 रोजी सादरीकरण केल्याबद्दल कोणत्याही शर्थीशिवाय मिकाला बॅन करत आहे. त्याच्यावर कोणत्याही मुव्ही प्रॉडक्शन हाऊस, म्युझिक कंपनी आणि ऑनलाईन म्युझिक प्रोव्हाईडर कंपनीकडून बहिष्कार टाकण्यात येत आहे.”

AICWAच्या अध्यक्षांनी जारी केलेल्या या स्टेटमेंटमध्ये असेही बोलले गेले आहे की, “ऑल इंडिया असोसिएशनचे कार्यकर्ते याची खात्री करतील की, भारतात कोणीही मिका सिंग सोबत काम करणार नाही. जर कोणी मिकासोबत काम केलं तर त्याच्या विरोधात लिगल अ‍ॅक्शन घेतली जाईल.
image.png
काय आहे प्रकरण ?
मिका सिंगचा एक व्हिडीओ समोर आला होता ज्यात मिका जनरल मुशर्रफ यांच्या नातेवाईकांच्या मेहंदीच्या फंक्शनमध्ये सादरीकरण करताना दिसला होता. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर मिकावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. यानंतर लोकांनी त्याच्यावर कारवाई करण्याची आणि त्याला बॅन करण्याची मागणी केली. कारण कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानने भारतीय सिनेमे बॅन केले. याशिवाय भारताविरोधात अनेक पावले उचलली. असे असतानाही मिका पाकिस्तानाता गेला आणि सादरीकरण केले. लोकांनी त्याच्या देशभक्तीवर सवाल उपस्थित केला.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like