‘कोरोना’ला नष्ट करू शकतो ‘कडूनिंब’ ? भारतात सुरू होतेय मानवी परीक्षण, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनावर लस शोधण्यासाठी अनेक डॉक्टरांची टीम दिवसरात्र प्रयत्न करत आहे. यामध्ये आयुर्वेद देखील अनेक प्रयोग करत आहे. ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ आयुर्वेदने निसर्ग हब्स नावाच्या कंपनीसोबत करार केला आहे. या दोन्ही संस्था कडुनिंब कोरोनावर कितपत फायदेशीर ठरेल याचे परीक्षण करणार आहेत. हे परीक्षण फरिदाबाद च्या ESIC हॉस्पिटलमध्ये केले जाणार आहे.

AIIA च्या डॉ तनुजा नेसारी या परीक्षणाच्या प्रमुख असतील. त्यांच्या सोबत ESIC हॉस्पिटलच्या डॉ असीम सेन असणार आहेत. या टीम मध्ये AIIA आणि ESIC चे आणखी 6 डॉक्टर असणार आहेत.

250 लोकांवर होणार चाचणी

ही टीम कडुनिंब कोरोनावर किती फायदेशीर ठरू शकतं, याचे परीक्षण 250 लोकांवर चाचणी करुन ठरवणार आहे. या रिसर्च मधून कडूनिंबाच्या कॅप्सूल कोरोना रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांचे कशा प्रकारे संरक्षण करू शकते याचेही परीक्षण करण्यात येणार आहे.

2 महिन्यांपेक्षा जास्त चालेल ही प्रक्रिया

यासाठी ज्या लोकांवर या कॅप्सूलचे परीक्षण केले जाणार आहे त्यांचा शोध सुरु झाला आहे. यामध्ये 125 लोकांना कडुनिंब कॅप्सूल दिले जाईल आणि सोबतच 125 लोकांना खाली कॅप्सूल दिले जाईल. ही प्रक्रिया 28 दिवस सुरु राहणार आहे आणि याच्या परिणामाचे निरीक्षण केले जाणार आहे.