आकाशवाणी पुणे केंद्रातील वृत्त निवेदक विजयकुमार लडकत यांचं 53 व्या वर्षी ‘कोरोना’मुळं निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   आकाशवाणी पुणे केंद्रातील वृत्त निवेदक विजयकुमार लडकत यांचं आज (दि २१ सप्टेंबर २० ) कोविड १९ मुळे निधन झालं; ते ५३ वर्षांचे होते. कोरोना संसर्गाचं निदान झाल्यानंतर त्यांना पूना हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. तिथेच उपचारा दरम्यान त्यांचं निधन झालं.

गेली १५ वर्ष ते आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून वृत्त निवेदन करत होते. त्याच बरोबर महात्मा ज्योतीराव फुले यांच्या चरित्राचा त्यांचा मोठा अभ्यास होता. महात्मा फुले यांचे चरित्र व्याख्याते अशी त्यांची ओळख होती. “माळी आवाज” या संस्थेचे ते संस्थापक होते. अत्यंत मनमिळाऊ आणि दिलखुलास स्वभावामुळे आकाशवाणीमध्ये ते लोकप्रिय होते. त्यांच्या निधनाबद्दल आकाशवाणीच्या सर्वच अधिकारी कर्मचाऱ्यांनी शोक व्यक्त केला आहे.