हल्ल्याच्या दाट शक्यतेमुळं जम्मू-काश्मीरमधील सैन्याला ‘हाय अलर्ट’

वृत्तसंस्था : कलम ३७० हटवल्यापासुन पाकिस्तानी घुसखोरीच्या प्रयत्नात आहेत. काश्मीर खोऱ्यातील शांतता भंग करण्यासाठी पाकिस्तानकडून कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळं जम्मू-काश्मीरमध्ये तैनात असलेल्या भारतीय सैन्याला दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. दशहतवादी हल्ला होण्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे.

लष्कर, वायुसेना आणि सर्व सुरक्षा सैनिकांना दक्ष राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गुप्तचर यंत्रणांनी सीमेपलीकडून दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तविली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काश्मीर खोऱ्यात तैनात असलेल्या सैन्य दलास आणि सुरक्षा दलांना कोणत्याही प्रकारच्या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी दक्ष राहा असा इशारा देण्यात आला आहे. गेल्या १२ दिवसात काश्मीर खोऱ्यात शांतात आहे. ती शांतता भंग करण्याचा प्रयत्न शत्रूकडून केला जाऊ शकतो.

त्यापाश्र्वभुमीवर हा इशारा देण्यात आला आहे. खाऱ्यातील सरकारी कार्यालये चालु करण्यात आली आहेत. जम्मू-काश्मीरचे सीफ सेक्रेटरी बीव्हीआर सुब्रमण्यम यांनी श्रीनगर येथील संचारबंदी हळूहळू मागे घेण्याची घोषणा केलेली आहे. त्यामुळे उद्यापासुन (शनिवार) मोबाईल आणि संपर्काची साधनं सुरू होणार आहेत तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थासुध्दा पुर्ववत होणार आहे. यासर्व पाश्र्वभुमीवर सेन्य दलाला दक्ष राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –