सावधान !… तर ३० नोव्हेंबरनंतर वाहनांसाठी दुप्पट टोल भरावा लागणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – या वर्षीच्या १ डिसेंबर पासून सर्व राष्ट्रीय महामार्गांवर टोल नाक्यांवर सर्व गाडयांना फास्टटॅगच्या आधारे टोल घेतला जाणार आहे. रस्ते आणि परीवहन मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले कि, १ डिसेंबर पासून टोल नाक्यांवर सर्व गाडयांना आता फास्टटॅगच्या आधारे टोल भरावा लागणार आहे. ज्या वाहनाला फास्टटॅग नसेल, त्याच्याकडून दुप्पट टोल वसूल केला जाईल. यासाठी मंत्रालयाने राष्ट्रीय राज्यमहामार्ग प्राधिकरणाला पत्र लिहून यासंबंधीचे आदेश पाळण्याच्या सूचना केल्या आहेत. सध्या प्रत्येक टोल नाक्यावर एक हायब्रीड लेन असून फास्टटॅग शिवाय अन्य सुविधा देखील आहेत. मात्र त्यानंतर सर्व लेन या फास्टटॅगवाल्या केल्या जातील.

मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार अनेक गाड्या फास्टटॅग नसताना देखील त्या लेनमधून जात असतात. या गाडया रोख पैसे देऊन टोल भरत असतात.त्यामुळे फास्टटॅगवाल्या लेनमध्ये देखील गर्दी होते. त्यामुळे या सेवेचा वापर करणाऱ्या नागरिकांना देखील अडचणींचा सामना करावा लागतो. या प्रक्रियेमुळे डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन मिळेल आणि टोल नाक्यांवर होणारी गर्दी देखील कमी होईल. यासाठी सर्व टोल नाक्यांवर पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नवीन वाहनांना कंपन्या लावत आहेत फास्टटॅग

मागील दाेन वर्षांपासून नवीन वाहनांना फास्टटॅग लावणे अनिवार्य आहे. त्यामुळे कंपन्या पहिल्यापासूनच वाहनांना फास्टटॅग लावून देत आहेत. जर तुमच्याकडे दोन वर्षांपेक्षा जुनी गाडी आहे तर तुम्हाला गाडीवर फास्टटॅग लावून घेण्याची गरज आहे.

येथून घेऊ शकता फास्टटॅग

१)भारतीय राष्ट्रीय राज्यमहामार्ग प्राधिकरणाचा टोलनाका

२) एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआय समवेत अनेक बँक

३)ऑनलाइन प्लेटफॉर्म पेटीएम, अमेझॉन डॉट कॉम

४)इंडियन ऑईल कॉरपोरेशन, भारत पेट्रोलियम, हिन्दुस्तान पेट्रोलियमचे पेट्रोल पम्प

५)नॅशनल हायवे अथॉरिटीचे माय फास्ट ऐप

या कागदपत्रांची आहे गरज

१)रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट

२) पासपोर्ट साइज फोटो

३) केवाईसी डॉक्यूमेंट, आयडी प्रूफ, अड्रेस प्रूफ

आरोग्यविषयक वृत्त