‘कोरोना’वरील ‘ही’ 5 औषधं मोफत देण्याचा सरकारचा विचार, CM ठाकरे यांची माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यावर कोरोनाच्या रुपानं अभूतपूर्व संकट ओढावलं आहे. दिवसेंदिवस राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा दीड लाखांच्या पुढे सरकला आहे. मागील दोन दिवसांपासून राज्यात दिवसाला उच्चांकी रुग्णसंख्येची नोंद होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्यावर भाष्य केलं.

राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने कोरोनावरील रेमडेमीसीवर, फॅबीपीरावीर, टॅझीलोझुमा, एचसीक्यू, डॉक्सी ही कोरोनाची औषधं शासकीय आणि निमशासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपलब्ध करून देण्याचा विचार प्रशासन करत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मात्र, यासाठी केंद्राची परवानगी आणि औषधांची उपलब्धता तितकीच महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, कोणत्याही औषधाच्या बाबतीत आपण पाठीमागे नाही आहोत. तुम्ही नाव सांगा ती औषध आपण वापरत आहोत. रेमडेसिवीर, फॅवीपिरावीर या औषधांसाठी मार्च, एप्रिलपासून आपण पाठपुरवठा करत होते. त्याची परवानगी मिळाली आहे. रेमडेमीसीवर, फॅवीपीरावीर, टॅझीलोझुमा, एचसीक्यू, डॉक्सी ही कोरोनाची औषधं शासकीय आणि निमशासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपलब्ध करून देण्याचा विचार प्रशासन करत आहे.

मात्र त्याला केंद्राची परवानगीची गरज आहे. रेमडेसीवीरसारखी औषध राज्य सरकार उपलब्ध करून देणार, तुटवडा भासू देणार नाही. ही औषधे शासकीय आणि निमशासकीय रुग्णालयात मोफत उपलब्ध करण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.