Photos : वयाच्या विशीत आलिशान कार घेणारी मराठी अभिनेत्री ! जाणून घ्या नेमकी आहे तरी कोण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – झी युवा वाहिनीवरील ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण मालिकेत सई ही प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री गौरी कुलकर्णी (Gauri Kulkarni) सध्या चर्चेत आली आहे. गौरी 2021 मध्ये आपली सर्व स्वप्नं पूर्ण करताना दिसत आहे. तिच्या चर्चेत येण्याचं कारणही खास आहे.

गौरीनं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. यात गौरी तिच्या नवीन महागड्या आणि आलिशान कार सोबत पोज देताना दिसत आहे. गौरीनं नुकतीच नवी गाडी घेतल्याचं दिसतंय. गौरी अवघ्या 20 वर्षांची आहे. अवघ्या 20 व्या वर्षीच एखादी मराठी अभिनेत्री कार घेते याचं चाहत्यांना खूप कौतुक वाटत आहे.

फोटो शेअर करताना गौरीनं खास कॅप्शही दिलं आहे. तिच्या चेहऱ्यावर तिचा आनंद स्पष्ट दिसत आहे. सध्या गौरीचा आनंद गगनात मावेनासा झालाय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

गौरीनं कारचे फोटो शेअर केल्यानंतर तिच्या चाहत्यांसह सहकलाकारांनीही यासाठी तिला शुभेच्छा दिल्या आहेत आणि तिचं कौतुक केलं आहे.

गौरीच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर ती मूळची अहमदनगरची आहे. तिथंच तिचं 12 वी पर्यंतचं शिक्षण झालं. तिनं पदवीचं शिक्षण घेतलं असून कथ्थक नृत्यात ती पारंगत आहे. कॉलेज स्तरावरील स्पर्धांमध्ये तिंन अनेक पारितोषिकं मिळवली आहेत.

गौरीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर 2017 साली आलेल्या रंजन सिनेमातून तिनं मराठी इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं. गावातील प्रेमकथेवर आधारीत हा सिनेमा होता. सध्या ती झु युवा वरील ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे.